Monday, 17 August 2026
नशा मुक्त भारत अभियान’च्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त १८ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय प्रतिज्ञा कार्यक्रम
नशा मुक्त भारत अभियान’च्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त १८ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय प्रतिज्ञा कार्यक्रम
धाराशिव दि.१७ ऑगस्ट (जिमाका) भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय,नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार ‘नशा मुक्त भारत अभियान’च्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवार,दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी “National Pledge Against Drug Abuse” (आमलीपदार्थांच्या गैरवापराविरुद्ध राष्ट्रीय प्रतिज्ञा) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व शासकीय कार्यालयांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यासोबतच महिला बचत गट,तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, अनुदानित,विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा व महाविद्यालयांमध्येही दि.१८ ऑगस्ट २०२६ रोजी व्यसनमुक्तीच्या अनुषंगाने “National Pledge Against Drug Abuse” (अमलीपदार्थांच्या गैरवापराविरुद्ध राष्ट्रीय प्रतिज्ञा) घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून व्यसनमुक्त भारताच्या संकल्पनेला बळ द्यावे,राष्ट्रीय प्रतिज्ञा डाउनलोड करण्यासाठी https://nashamukt.dosje.gov.in/activities या लिंकचा वापर करावा,असेही आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सचिन कवले यांनी केले आहे.
******