Sunday, 16 August 2026
धार्मिक,ऐतिहासिक वारशाचे जतन करून पिंपळा खुर्दच्या विकासाला गती देणार पालकमंत्री प्रताप सरनाईक
धार्मिक,ऐतिहासिक वारशाचे जतन करून पिंपळा खुर्दच्या विकासाला गती देणार
पालकमंत्री प्रताप सरनाईक
पिंपळा (खुर्द) येथील शंभू महादेव देवस्थानच्या नंदी आणि दीपस्तंभचे भूमिपजन
धाराशिव दि.१४ ऑगस्ट ( जिमाका ) धाराशिव जिल्ह्याच्या विकासासोबतच जिल्ह्याच्या ऐतिहासिक,धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.पिंपळा खुर्द येथील श्री शंभू महादेव मंदिराला भविष्यात अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात,भाविकांची गैरसोय होऊ नये आणि या देवस्थानाची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी,यासाठी आवश्यक ते सहकार्य करू अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
आज १४ ऑगस्ट रोजी तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्दपिंपळा (खुर्द) ता.तुळजापूर येथील शंभू महादेव देवस्थान पिंपळा खुर्द येथील देवस्थानच्या नंदी आणि दीपस्तंभचे भूमिपजन श्री. सरनाईक यांच्या हस्ते झाले.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती.अर्चना पाटील,माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,सुमारे २ हजार वर्षांची ऐतिहासिक व आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या श्री शंभू महादेव मंदिराला हेमाडपंथी स्थापत्यकलेचा वारसा लाभला आहे.या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून आतापर्यंत सुमारे ५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मंदिराचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.स्वयंभू व जागृत शिवलिंगाच्या दर्शनासाठी धाराशिवसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक येतात. महाशिवरात्र,कावड मिरवणूक, छबिना,शिवकथा,भागवत कथा, अखंड हरिनाम सप्ताह,दिंडी सोहळे,महाप्रसाद तसेच दररोज हरिपाठ-भजन अशा विविध धार्मिक उपक्रमांमुळे हे मंदिर भक्ती,अध्यात्म आणि सामाजिक एकात्मतेचे केंद्र बनले आहे.असे त्यांनी सांगितले.
श्री.सरनाईक पुढे म्हणाले की, मंदिर परिसरात उभारल्या जाणाऱ्या दीपस्तंभामुळे केवळ मंदिर परिसर उजळणार नाही,तर आपल्या श्रद्धेचा प्रकाश पुढील अनेक पिढ्यांपर्यंत घेऊन जाईल.या मंदिराचा परिसर शोभनीय करू तसेच बारजचा पुनरुत्थान करण्यात येईल.असे सांगितले.
यावेळी पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी मंदिराच्या विकासासाठी ११ लाख रुपये वैयक्तिक देणगीची घोषणा केली.
श्रीमती.पाटील म्हणाल्या की,
पालकमंत्री यांच्या माध्यमातून या गावाच्या विकासाला मदत होईल. ३० लाख रुपये मंदिर विकासासाठी जिल्हा परिषदेच्या तीर्थक्षेत्र विकासनिधीतून देण्यात येईल.येथील मंदिराला ब वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.साडेपाच कोटी रुपये लोकवर्गणीतून ग्रामस्थानी देवस्थान विकासासाठी दिले आहे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मंदिराचे बांधकाम करणारे
शिवाजीराव गुटे आणि जयकुमार देवस्थान बांधणारे यांचा सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाला पिंपळा(खुर्द) चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पालकमंत्री यांचे आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केले.
*****

