उस्मानाबाद,दि.25:- जिल्हा परिषद व पंचायत
समिती सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यासाठी
संबंधित तालुक्यातील गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांची आचारसंहिता प्रमुख
म्हणून नियुक्ती केली आहे.
उस्मानाबाद तालुक्यासाठी गट विकास
अधिकारी वर्ग–1, पंचायत समिती उस्मानाबाद, तुळजापुर तालुक्यासाठी गट विकास अधिकारी
वर्ग–1, पंचायत समिती तुळजापुर, उमरगा तालुक्यासाठी
गट विकास अधिकारी वर्ग–1, पंचायत समिती
उमरगा, लोहारा तालुक्यासाठी गट
विकास अधिकारी वर्ग–1, पंचायत समिती
लोहारा, कळंब तालुक्यासाठी गट
विकास अधिकारी वर्ग–1, पंचायत समिती कळंब,
भूम तालुक्यासाठी गट विकास अधिकारी, पंचायत समिती भूम, परंडा तालुक्यासाठी गट
विकास अधिकारी, पंचायत समिती परंडा, वाशी तालुक्यासाठी गट विकास अधिकारी, पंचायत
समिती, वाशी आदींची नियुक्ती तालुका आचारसंहिता प्रमुख म्हणून करण्यात आली
असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कळविले आहे.