उस्मानाबाद,दि.23 :- भारत निवडणूक
आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हयात 25 जानेवारी हा दिवस "राष्ट्रीय मतदार दिवस" दिन म्हणून साजरा
करण्यात येतो.
त्यानिमित्ताने प्रत्येक तालुक्यामध्ये 10 प्रमुख गावांमध्ये /शहर शाळेतील
विद्यार्थ्यांमार्फत रॅली काढून मतदान जागृती करून मतदार दिवस साजरा करण्यात येत
आहे. शहराच्या ठिकाणी एन. सी. सी. च्या
विद्यार्थ्यांमार्फत मार्च पास करण्यात येणार आहे. जिल्हयातील शाळेमध्ये चित्रकला,
रांगोळी व निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे व त्यांना मुख्याध्यापकांमार्फत
प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे, नवीन मतदारांचे इपिक कार्ड पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात येण्यार आहे. प्रत्येक
बी. एल.ओ. मार्फत नवीन मतदारांना इपिक कार्ड वाटपाचा कार्येक्रम प्रत्येक मतदान
केंद्रनिहाय घेण्यात येणार आहे, विद्यापीठस्तरावर युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात
आले आहे. महिला मतदारांसाठी महिला वसतिगृह, अंगणवाडी, सेविका, अशा मदतनीस यांच्याकडून
महिलांमध्ये मतदार नोंदणीचे प्रमाण वाढावे
यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, स्थलांतरीत,
अपंग, आदिवासी बेघर तृतीयपंथी यासारख्या विशिष्ट प्रवर्गासाठी उपक्रम हाती घेण्यात
आला आहे. त्याच्याकरिता नागरी सेवा संस्था शासन विभाग महामंडळ यांच्यामार्फत विशेष
मोहिमेचे आयोजन करण्यात आहे, यानुसार जिल्हयात सर्वत्र हा कार्यक्रम राबविण्यात
येत आहे .
तरी सर्व मतदारांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (निवडणूक)
अधिकारी प्रभोदय मुळे यांनी केले
आहे.