उस्मानाबाद,दि.25:-
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरूवार दि.26 जानेवारी 2017 रोजी सकाळी ठीक
9 वाजून 15 मिनिटांनी मा.मंत्री, परिवहन खारभूमी विकास तथा पालकमंत्री श्री.दिवाकर
रावते यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस संचलन मैदान,
उस्मानाबाद येथे होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी
डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी ध्वजारोहण होणार आहे.
जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष
ॲड.कुलदीप (धीरज) आप्पासाहेब कदम-पाटील यांच्या हस्ते सकाळी ठीक 8 वाजून 15
मिनिटांनी होणार आहे तरी या ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा
परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) शिरीष बनसोडे यांनी केले आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या
67 व्या वर्धापन दिनानिमित्त 26 जानेवारी 2017 रोजी सकाळी 8 वाजून 25
मिनिटांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या
हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे.
नगरपरिषद प्रांगणात नगराध्यक्ष श्री. मकरंद शूरसेन
राजेनिंबाळकर यांच्या हस्ते सकाळी ठीक 7 वाजून 50 मिनिटांनी ध्वजारोहणाचा समारंभ होणार आहे.
ध्वजारोहण समारंभास सर्वांनी समारंभ सुरू होण्यापूर्वी 30
मिनिटे अगोदर राष्ट्रीय, समारंभीय पोशाखामध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी स्थानापन्न व्हावे
असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात
आले आहे.