उस्मानाबाद,दि.25:- राष्ट्रीय मतदार
दिवसाच्या माध्यामातून भावी मतदार असलेल्या तरूण पिढीला मतदार बनवून मतदानाच्या
प्रक्रियेत सहभागी करण्याचे उदिष्ट आहे व हाच सुज्ञ भावी मतदार भारतीय लोकशाही
बळकट करण्यासाठी आवश्यक आहे. येथील
जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयात आज राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला .
यावेळी
अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी
उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा पुरवठा
अधिकारी अरविंद लाटकर, उपजिल्हाधिकारी सुनिल बारावकर , महाविद्यालयीन विद्यार्थी व
निवडणूक विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
उपजिल्हा
निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे यांनी आज संपूर्ण देशात राष्ट्रीय मतदार
दिवसानिमित्त मतदार जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जात असल्याचे सांगून यावर्षीच्या
सातव्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे “ सक्षम करू या, युवा व भावी मतदार ” हे घोषवाक्य असल्याचे सांगितले. तसेच मतदार जनजागृतीसाठी
निवडणूक विभागाकडून घेण्यात आलेल्या चित्रकला, रांगोळी, निबंध स्पर्धांची माहिती
त्यांनी याप्रसंगी दिली. तसेच राष्ट्रीय मतदार दिवसाच्या आयोजनाचा
उद्देश सांगून प्रत्येक नागरिकाने मतदार बनुन मतदान करण्याचे आवाहनही श्री. मुळे
यांनी केले.
राष्ट्रीय
मतदार दिनानिमित्त मतदारामध्ये जनजागृती करण्यासाठी विविध शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत मतदान
जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांमार्फत मार्च
पास करण्यात आला , नवीन मतदारांना इपीक
कार्ड , पुष्प गुच्छ देऊन यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला, परिसंवाद
कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना व्हिडिओ व कॉम्प्युटरच्या साह्याने शिक्षित
करण्यात आले, तसेच युवा मतदारांना ई.व्ही.एम. मशीनची माहिती करुन देण्यात आली तसेच त्यांना मतदान करण्यासाठी
प्रोत्साहित करण्यात आले , असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे यांनी
कळविले आहे.
*****