सानप सर आपण
येथे झालात रुजू,तेव्हापासून माझे रुपडे लागले सजू
आपण ठरवलं मला टाकायला लावयाची कात ,माझ्या
उत्कृष्ट कर्मचाऱ्यांची मिळाली आपणास साथ,
चांगले काम
करणाऱ्यांच्या पाठीवर ठेवला आपण हाथ
अशाप्रकारे आपण
कामाची केली सुरूवात,
माझ्या नाकावरच
होते घाणीचे राज्य
आपण ते
हटवण्यासाठी झालात सज्ज,
प्रवेशद्वारात
येताच लोक धरत होते मुठीत नाक
आपण दिली
सर्वांना स्वच्छतेची हाक ,आपणाला माहीत आहे रोगाचे मूळ कारण अस्वच्छता,
म्हणूनच सर्वांच्या
आरोग्यासाठी केली आपण स्वच्छता
खिडकीतून टाकलेला
कागदाचा बोळा ,
तो सुध्दा आपण
केलात गोळा
आपण
सहकार्यांसोबत हातात घेतला झाडू,
मला हात असते
तर भरवला असता लाडू
माझे रात्रंदिवस
उघडे होते दरवाजे तीन ,
येथे घडणाऱ्या
वाईट कामांमुळे माझी भावना झाली होती हीन,
आपण पुरवली मला
सुरक्षा,
माझ्या अब्रूची
झाली रक्षा,
माझ्या आवारात
पार्किंगची गोष्ट साधी ,
बरेचसे दम
भरतात नको लागू माझ्या नादी,
मिटींगला
बोलवण्यासाठी आपण मारल्या चकरा,
माझ्या
कर्मचाऱ्यांना वाटले- काय लावलाय नखरा!!
कर्मचाऱ्यांना वाटत होते याकामी खिशातून देण्या
लागेल निधी,
पण शासकीय
पावती देऊन ही वेळ नाही येऊ दिली कधी,
माझाही समज
होता खूप अधिकारी आले आणि गेले
पण माझ्यासाठी
काहीच नाही केले.,
पूर्वी मी होते
रूसली ,
घाण अस्वच्छता
नेसली
आपल्याममुळे
मी LED च्या प्रकाशात बसली,
तेव्हा आपसूकच
मी खुदकन हसली
तेंव्हा आता सर्वांना मी छान दिसली,
तुमचा मला
अभिमान आहे खरा
माझ्यासाठी
तुमच्या सारखेच अनुयायी तयार करा,
सी.सी.टी.व्ही
त जेव्हा मी दिसेल
तेंव्हा मी
खूपच नशीबवान असेल,
आरश्यांनी भरा
माझे कोपरे,लोकांना पिचकारी मारण्याचे बंद होतील नखरे,
सानप सर , सामाजिक
बांधीलकीची आपणास आहे जाण
त्यामुळे आपण
करता सर्वांच्या सहकार्याने काम छान,
स्वच्छतेमुळे
माझीही वाढली शान
आपल्या ह्या
प्रेरणेचा माझे कर्मचारी,
सदैव राखतील
मान,
सदैव राखतील
मान…. !!
-श्री.
गाडे एन.एच.
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,
जिल्हा हिवताप कार्यालय ,
उस्मानाबाद