उस्मानाबाद,दि.8:-दिव्यांगांच्या
सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून शासनाच्या
जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत उस्मानाबादमधील सर्वच शाळांनी संमिश्र यश
मिळविले. या स्पर्धेत एकूण 750 दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
अस्थिव्यंग प्रर्वगातून लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी शाळेने सर्वाधिक 18
सूवर्ण, 13 रौप्य व 16 कांस्यपदकांसह एकूण 47 पदकांसहित एकूण 161 गुणांची कमाई
केली.
शहरातील
तुळजाभवानी स्टेडीयमवर नुकत्याच या स्पर्धा पार पडल्या.मूकबधीर प्रवर्गातून कळंब
येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाने नऊ रौप्य व आठ कांस्यपदकांसह एकूण 17 पदकांसह 88
गुण मिळविले. तसेच मतिमंद प्रर्वगातून उस्मानाबाद तालुक्यातील स्वआधार मतिमंद मुलींच्या
अनाथ बालगृहाने 18 सूवर्ण 11 रौप्य,11 कांस्य अशा एकूण 40 पदकांसह 145 गुणांची
कमाई केली.
याशिवाय दिव्यांगांच्या
सांस्कृतिक स्पर्धाही घेण्यात आल्या. यात देशभक्तीपर गीते, लोकगीते, भारुड, गवळणी सादर करुन
विद्यार्थ्यांनी उपस्थितांची दाद मिळविली. सर्व स्पर्धांत प्रथम, द्वितीय,
तृतीय तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
जिल्हा परिषद
अध्यक्ष ॲड. धीरज पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, जिल्हा समाज कल्याण सभापती हरीश डावरे,समाज कल्याण अधिकारी एस. के. मिनगिरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी
अभियंता विश्वभर शिंगणवाड, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी
टी. के नवले आदींनी आकाशात फुगे सोडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या वेळी प्रहार
अपंग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मयुर काकडे, ॲड. भानुदास कलवले आदी उपस्थित होते.
भारत सरवदे पाटील, चंद्रकांत जाधव, शहाजी चव्हाण, रसिक
कोतवाल, प्रताप भायगुडे, बालाजी शिंदे, जुनेद शेरीकर, दादासाहेब जगताप, सुभाष
शिंदे, बालाजी लोमटे, नेताजी सिरसाट आदीनी
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
प्रयत्न केले.