उस्मानाबाद , दि. 9:- जिल्हा प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने आज
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरामध्ये
प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले . यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक श्री. योगेश प्रशिक्षक हे उपस्थित होते .
श्रीमती तेलोरे म्हणाल्या की , आपत्ती ही कोणास
सांगून किंवा ठरवून येत नाही . ती अचानक घडलेली
किंवा घडवून आणलेली आपत्ती असते . याला आपण सर्वांनी धैर्याने सामोरे जावून
या काळात प्रत्येक क्षणोक्षणीचा विचार करुन आपल्या परिसरात व आजूबाजूस अशी आपत्ती
येऊ नये अशी काळजी घेणे नितांत गरजेचे आहे.
जिल्हाभरात कोणतेही कार्यालय असू किंवा
रहदारीचे ठिकाण असो या ठिकाणी जर
आपणास अनोळखी किंवा संशयास्पद वस्तू आढळून
आल्यास त्याची माहिती नजिकच्या पोलीस यंत्रणेस , अग्निशमन विभाग आणि जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन कार्यालयास कळविल्यास येणारी आपत्ती दूर होण्यास मदत होईल .
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप
, कृषी विभागाचे प्रशासन अधिकारी श्री. गणेश गोरे , सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील ,
एम.ए.सय्यद , एमएसईबीचे सहायक अभियंता रत्नदीप कटके , बॉम्बशोधक पथकाच्या महिला
पोलीस श्रीमती मोक्षदा गर्जे , जिल्हा
रुग्णालयाचे 108 या रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश घोळवे आणि मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते .