उस्मानाबाद,दि.5:-लोकशाही
दिनानिमित्त प्राप्त झालेल्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करुन तक्रारदारास त्वरीत निर्णय द्यावा , अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी देवून काही तक्रारींचे निराकरणही केले .
आज लोकशाही दिनानिमित्त जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजित लोकशाही दिन
कार्यक्रमास निवास उप जिल्हाधिकारी सुनिल
यादव , सामान्य प्रशासन विभागाचे उप
जिल्हाधिकारी सचिन बारवकर , जिल्हाधिकारी
कार्यालयातील उप जिल्हाधिकारी , तहसिलदार , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी व पोलीस विभागाचे अधिकारी व इतर विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित
होते .
या
लोकशाही दिनात जिल्हा भरातून आलेल्या तक्रारदारांनी आपल्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्या असता जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी संबंधितांच्या तक्रारींची दखल घेवून प्रत्यक्ष
तक्रारदारांशी चर्चा करुन संबंधित
विभागांना तक्रार निवारणासाठी सूचना दिल्या .