राज्यस्तर युवा पुरस्कार सन 2016-17
साठी प्रस्ताव दाखल करावेत
उस्मानाबाद.दि.24:-
राज्यात सामजिक क्षेंत्रात कार्य केलेल्या युवक -युवती व संस्थांचा यथोचित गौरव
करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र
राज्य पुणे मार्फत दरवर्षी राज्यस्तर युवा पुरस्कार देण्यात येतो. राज्यातील
युवांनी केलेले समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे
यासाठी प्रत्येक विभागातून एक युवक, एक
युवती, एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येतील. या युवक /युवती पुरस्काराचे
स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम पन्नास हजार रुपये, संस्थेसाठी पुरस्काराचे
स्वरूप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम
एक लाख असे असेल.या पुरस्कारासाठी
यापुर्वी प्रस्ताव मागविलेले आहेत. परंतू पुरेसे प्रस्ताव प्राप्त न झाल्यामुळे
प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
या पुरस्कारासाठी युवक/युवतीस अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी
भागात केलेले सामाजिक कार्य,
राज्याचे साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच
राष्ट्र उभारणीच्या विकासाठी सहाय्यभुत
ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसुचीत जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग इ.
बाबतचे कार्य, शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण सांस्कृतिक कला,
क्रीडा मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभुण,
व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वागीण विकासासाठी
केलेले कार्य. राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छ
वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला
सक्षमीकरण बाबतचे कार्य असावे.
पुरस्काराच्या अटी
व शर्ती, पात्रता, अर्ज याबाबत सविस्तर माहिती संचालनालयाच्या
संकेतस्थळ www.maharashtra.gov.in यावर क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या 201311121122043321 या संकेतांकावर उपलब्ध आसून. याबाबत सविस्तर माहितीसाठी जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय, श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद यांचेशी संपर्क
साधावा व युवक/युवती/संस्था यांनी
पुरस्कारासाठीचे परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 28 ऑगस्ट 2017 पर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, मुदतीनंतर आलेल्या प्रस्तावांची
शिफारस कोणत्याही परिस्थितीत करण्यात येणार नाही, असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.
संजय महाडिक यांनी कळविले आहे.