उस्मानाबाद. दि.19 :- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन
कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात दि.5 ते 20 सप्टेंबर 2017 या कालावधीत कुष्ठरोग शोध
मोहिम राबविण्यात येणार आहे.या कालावधीत आपल्या घरी तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करुन
कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रत्यक्ष तपासणी करुन घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन निवासी
उपजिलहाधिकारी राजेंद्र
खंदारे यांनी केले.
राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मुलन
कार्यकम हा प्रधानमंत्री ,भारत सरकार यांचे प्रगती योजनेत समाविष्ट करण्यात आलेला
आहे. या अंतर्गत कृष्ठरोग शोध मोहिम 2017-18 ( Leprosy Case Detection
campaign-LCDC ) उसमानाबादासह महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात दि. 05 सप्टेंबर ते 20
सप्टेंबर 2017 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या नियोजन व विविध
विभागाच्या समन्वयासाठी तालुका व जिल्हा पातळीवर समन्वय समित्यांचे गठन करण्यात
आलेले आहे. जिल्हा समन्वय समितीची बैठक
निवासी उप जिल्हाधिकारी श्री. राजेंद्र खंदारे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात
आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी
राज्यस्तरीय निरीक्षक डॉ. श्रीमती राठोड, डॉ. मिटकरी, सहाय्यक जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ.पांचाळ, जिल्हा क्षयरोग आरोग्य अधिकारी डॉ. फुलारी,
निवासी वैदयकीय अधिकारी डॉ. प्रताप
शिंदे, वैदयकीय अधीक्षक स्त्री
रुग्णालय डॉ. वाघमारे, जिल्हा
हिवताप अधिकारी श्री. बोरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा
(कृष्ठरोग ) डॉ. भागवत खडके यांनी प्रास्ताविक करुन मोहिमेबाबत सविस्तर
माहिती दिली. मोहिम कालावधीत जिल्ह्यातील संपुर्ण ग्रमीण व निवडक शहरी भागातील
लोकसंख्याचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षण आशा कार्यकर्ती व पुरुष कर्मचारी /स्वयंसेवक यांच्या संयुक्त
टिमद्वारे घरोघर जाऊन करण्यात येणार आहे. वैदयकीय अधीक्षक, तालूका आरोग्य अधिकारी,
वैदयकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे प्रत्यक्ष नियंत्रणाखाली
त्यांचे कार्यक्षेत्रात मोहिम राबविली जाणार आहे.
मोहिम कालावधीत आपल्या घरी
तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करुन कुटुंबातील सर्व सदस्यांची
प्रत्यक्ष तपासणी करून घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी
केले. तसेच मोहिम कालावधीत सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सुचना निवासी उपजिल्हाधिकारी श्री.खंदारे यांनी
दिल्या.
शिक्षण अधिकारी प्राथमिक यांचे प्रतिनिधी
व इतर जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते.