उस्मानाबाद,दि.23:- कृषी विभागाकडून राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2017-18 योजनेअंतर्गत फलोत्पादन यांत्रिकीकरण व कांदाचाळ हे घटक राबविण्यात
येणार आहेत. योजने अंतर्गत अभियानामध्ये इच्छुक लाभार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधुन ऑनलाईन अर्ज 31 ऑगस्ट 2017
पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
हा कार्यक्रम राबविताना मार्गदर्शक
सुचनेनुसार महिला 30 टक्के, अनुसुचित जाती 16 टक्के व अनुसूचित जमाती 8 टक्के व
अपंग 3 टक्के व उर्वरीत सर्वसाधारण या प्रमाणे विहीत केलेल्या टक्केवारीनुसार लाभ
देण्यात येणार आहे. सन 2017-18 मधील तालुकानिहाय लाभार्थ्यांचे अर्ज www.hortnet.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन
पध्दतीने स्विकारले जातील. लाभार्थ्याची सोडत (लकी ड्रॉ) पध्दतीने निवड करण्यात
येणार आहे.दि. 31 ऑगस्ट नंतर ऑनलाईन
झालेल्या अर्जाचा सोडत (लकी ड्रॉ) पध्दतीमध्ये विचार केला जाणार नाही. प्रत्येक
घटकासाठी शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे. जुन्या अर्जाचा या प्रक्रियेमध्ये विचार केला
जाणार नाही.ऑनलाईन अर्ज शेतकरी स्वत: भरु शकतात तसेच शक्य नसल्यास तालुका कृषी
अधिकारी कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्याच्या मदतीने शेतकरी अर्ज करु शकतील परंतु
अर्ज ऑनलाईन झाल्याची खात्री शेतकऱ्यांने
स्वत: करावी.असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात
आले आहे.