उस्मानाबाद,दि.22:- शासन निर्णय 28 जून 2017 अन्वये
दि. 30 जून 2017 अखेर थकबाकीदार असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी
महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 राबविण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध करुन
देण्यात आलेले आहेत. कर्जमाफीचे अर्ज ग्रामपंचायतचे आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई
सेवा केंद्र, CSC-SPV केंद्रावर निशुल्क भरण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांनी कर्ज
माफीचे अर्ज ऑनलाईन भरुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण
गमे यांनी केले आहे.
विहीत नमुन्यातील कर्जमाफीचे
अर्ज, सर्व सहाय्यक निबंधक कार्यालय, तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय,
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सर्व ग्रामपंचायत, सर्व विकास सेवा सहकारी संस्था,
सर्व बँका आणि CSC-SPV केंद्रावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक
सहकारी संस्था कार्यालयात आदी ठिकाणी उपलब्ध असून ते ऑनलाईन भरण्यासाठी ग्रामपंचायतचे
आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई सेवा केंद्र, CSC-SPV केंद्रावर निशुल्क भरण्यात
येत आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व त्यांचे
कार्यालयातील क्षेत्रिय अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे
अर्ज ऑनलाईन केंद्रावर भरुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.