उस्मानाबाद,दि.7:- जिल्हा कोषागार कार्यालय व शासकीय आयुर्वेद रुग्णालय
यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिना निमित्त कोषागार कार्यालयात मोफत
आरोग्य शिबिर घेवून 145 कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले
यामध्ये शासकीय कर्मचारी, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश होता, असे कोषागार
अधिकारी विशाल पवार यांनी सांगितले.
या आरोग्य शिबिरात मधुमेह,
रक्तदाब, वजन तपासणी व मधुमेहाविषयी उपस्थितांना आहाराचा सल्ला देण्यात आला. तसेच
आयुर्वेदिक औषधीची चित्सिका करून पंचकर्मा विषयी माहिती देण्यात आली.
या आरोग्य शिबिर
कार्यक्रमात आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक, विभाग प्रमुख, स्त्रीरोग प्रसुती
तंत्र विभाग वैद्य. विणा पाटील, वैद्यकीय अधिकारी वैद्य. उमा आंधळकर, सहयोगी प्रा.
निदान विभाग वैद्य. एस.के.नाम्बे, सहाय्यक प्रा. कार्यचिकित्सा विभाग वैद्य.
विनायक पाचे यांनी सहभाग नोंदवला.
या जागतिक आरोग्य दिनानिमित्त
आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिर यशस्वीतेसाठी कोषागार कार्यालयातील अप्पर
कोषागार अधिकारी श्री. अप्पासाहेब पवार व इतर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.