उस्म्नाबाद,दि.8:-.अनुसूचित जाती व सर्व
प्रकारचे पीडीत शोषित असलेल्यांना सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध
करून देण्याबाबबात राज्य सरकार
सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्या
अनुषंगाने अनुसूचित जाती, वंचित दूर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबवण्यिात येत
आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्याचे उद्देश
साध्य व्हावेत,याकरीता राज्यात भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह दि.8 ते 14 एप्रिल या कालावधीत साजरा
करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची आजपासून सुरूवात झाली आहे.आपण सर्वजण
हा “सामाजिक
समता सप्ताह” प्रत्यक्ष
कृतीतून साजरा करूया असे आवाहन
उस्मानाबाद जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त स्वाती इथापे यांनी
आज येथे केले सामाजिक न्यायभवनच्या सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक समता सप्ताहांच्या उदघाटन समारंभ
आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी त्या बोलत
होत्या.
सामाजिक न्यायभवनच्या
सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, सहाय्यक
आयुक्त श्रीमती एस.एस.मते, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त शंकरराव खुने, संशोधन अधिकारी संतोष खुने, आदींची उपस्थिती होती.
श्रीमती
इथापे पुढे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला,समता,स्वातंत्र्य व बंधुत्व या त्रयीने समाजामध्ये एकात्मता निर्माण
करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्य घटनेतही राज्य हे दुबर्लतर जनवर्ग आणि विशेषत:
अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक
हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण
करील असेही नमूद केले आहे. सामाजिक
परिस्थितीचा समतोल राबविणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, हे कर्तव्य बजावताना
आपल्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
या
कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक न्याय विभागाच्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या
शासकीय वसतीगृहे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर स्वाधार योजना,अत्याचारास बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित
जमातीच्या कुटुंबातील अर्थसहाय्य योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकासाठी रमाई
आवास घरकुल योजना, मिनी ट्रक्टर योजना, शैक्षणिक योजना,कर्मवीर दादासाहेब गायकवाड
स्वाभिमान व सबळीकरण योजना, विजाभज आश्रम
शाळा या योजनांची माहितीही उपस्थितांना देण्यात आली.
प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त श्रीमती एस.एस.मते यांनी
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापर्यंत चालणाऱ्या या सामाजिक
समता सप्ताहाची रुपरेषा व त्याअंतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रम-उपक्रमांची माहिती
दिली.
कार्यक्रमाचे उदघाटन सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते
दीप प्रज्वलनाने झाले.तसेच भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे
पूजनही करण्यात आले. भगवान चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. गृहपाल श्री. बाप्पा नाईकनवरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विविध
महामंडळांचे पदाधिकारी, अधिकारी तसेच तालुका समन्वयक, समता दूत, समाज कल्याण तसेच
विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आदींचीही उपस्थिती होती.