उस्मानाबाद,दि.7:-केंद्र
शासनाच्या सेवायोजना कार्यालये (सक्तीने पदे अधिसूचित करण्यास भाग पाडणे ) कायदा
1959 व त्याअंतर्गत नियमावली 1960 पारित केली असून या कायद्याच्या कलम 5 अन्वये
सर्व संबंधित उद्योजकांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाची माहिती दर तिमाहीस विहित
प्रपत्र ईआर-1मध्ये या कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे.
कायद्यातील नियम 6 च्या
पोटनियम 3 मध्ये निर्धारित करण्यात आलेले आहे,तिमाही विहीत प्रपत्र ईआर-1 च्या
प्रयोजनार्थ प्रत्येक वर्षाच्या 31 मार्च,30 जून,30 सप्टेंबर व 31 डिसेंबर या
विहित तारखा असतील व विहीत प्रपत्र या विहित तारखापासून एक महिन्याच्या आत सादर
करणे अनिवार्य आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्हयातील सर्व आस्थापनांनी दिनांक 31
मार्च 2017 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ई.आर.-1 व केंद्र शासन,राज्य शासन,निमशासकीय
कार्यालये, शासकीय अंगीकत उपक्रम,महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था या
आस्थापनांनी दि.30 सप्टेंबर 2016 अखेरचे द्विवार्षिक विवरणपत्र ई.आर.2 सह दि.30
एप्रिल 2017 पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.तथापि ज्या आस्थपनांनी अधिनियम 1959
कलम 7 (2) अन्वये विवरणपत्र न पाठविणाऱ्या आस्थापनास दोषी मानण्यात येईल व
त्याविरूध्द न्यायालयीन अभियोग दाखल केला
जाईल.
तिमाही विवरणपत्र उद्योजकांना ऑनलाईन सादर करता
यावे,यासाठी विभागामार्फत या http://www.maharojgar.gov.in
हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले
असून, या वेबपोटलद्वारे दिनांक 31 मार्च
-2017 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ई.आर. -1 व द्विवार्षिक विवरणपत्र ई.आर.2 दि.30
एप्रिल 2017 पर्यंत,आपल युजर आयडी व पावर्ड वापरुन ऑनलाईन पध्दतीने भरावे, असे आवाहन
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक
श्री.रमेश पवार यांनी केले आहे.