नगरपरिषद
सार्वत्रिक निवडणूक 2016-17
उस्मानाबाद
नगरपरिषद निवडणूक 2016 ची मतमोजणी सोमवार दि.28 रोजी सकाळी 10-00 वाजल्यापासून सुरू होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने
काटेकोर नियोजन केले असून चोख बंदोबस्तही ठेवला आहे.
उस्मानाबाद
नगरपरिषदेची मतमोजणी शासकीय आयुर्वेदिक
महाविद्यालय येथे ,तुळजापूर नगरपरिषदेची
मतमोजणी श्री. तुळजाभवानी
अभियांत्रिकी महाविद्यालय येथे, कळंब
नगरपरिषदेची मतमोजणी शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्था येथे, भूम नगरपरिषदेची
मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था , परंडा नगरपरिषदेची मतमोजणी नगरपरिषद कार्यालय (नवी इमारत) येथे,
मुरूम नगरपरिषदेची मतमोजणी मुरूम एन. पी
सभागृह येथे, नगरपरिषदेची मतमोजणी अंतुबली सभागृह येथे तर नळदूर्ग नगरपरिषदेची
मतमोजणी एन. पी सभागृह येथे सकाळी
10-00 वाजल्यापासून सुरू होईल,
त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक निर्णय
अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत
नारनवरे यांनी मतमोजणीसाठीच्या तयारीबाबत आज विविध यंत्रणांना काटेकोरपणे नियोजनाचे निर्देश दिले तसेच मतमोजणीसाठीच्या व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेवून
पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्याबाबत पोलीस दलाला आवश्यक त्या सूचना दिल्या.