उस्मानाबाद,दि.29:- सन 2017 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा
आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून हे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे .
तांत्रिक सहायक
परीक्षा, विक्रीकर निरीक्षक परीक्षा, राज्य सेवा परीक्षा 2017, पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा
परीक्षा, सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2017, लिपिक-टंकलेखक परीक्षा, दिवाणी
न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2017, दुय्यम
निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क गट-क परीक्षा 2017, महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2017,
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2017, सहायक कक्ष अधिकारी मर्यादित
विभागीय स्पर्धा परीक्षा 2017, सहायक कक्ष अधिकारी-विक्रीकर निरीक्षक- पोलीस
उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा 2017, महाराष्ट्र कृषि सेवा परिक्षा 2017 आणि विक्रीकर
निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017 इत्यादी परीक्षा सन 2017 मध्ये
आयोगामार्फत घेण्यात येणार आहेत .****