उस्मानाबाद,दि.2:- जिल्हा वार्षिक योजना सन
2017-18 चा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी शासनाकडून उस्मानाबाद
जिल्ह्याकरिता सर्वसाधारण
योजनांसाठी एकूण 13,558 लक्ष
ची वित्तीय मर्यादा
कळविण्यात आली आहे . जिल्ह्यासाठीच्या वार्षिक
योजना वेळापत्रकाप्रमाणे तयार करुन
त्यास लहान गटाची
व तद्नंतर जिल्हा नियोजन समितीची
मान्यता घेऊन नियोजन विभागास
सादर करण्याच्या शासनाकडून प्राप्त
झालेल्या सूचनेनुसार आज दिनांक 2 डिसेंबर
2016 रोजी जिल्हा नियोजन समिती लहान गटाची बैठक संपन्न झाली .
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा आमदार (वि.स.स) श्री. ज्ञानराज चौगुले ,
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री.सुभाष
गुंडा माळी , वैधानिक विकास मंडळाचे सदस्य
श्री. बी.बी.ठोंबरे , अति.मुख्य
कार्यकारी अधिकारी श्री. अनुप शेंगुलवार हे उपस्थित होते .
या बैठकीमध्ये प्रत्येक
योजनेवर सविस्तर चर्चा करण्यात
आली तसेच प्रारुप आराखड्याची छाननी लहान गटामार्फत करण्यात आली तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2016-17 मध्ये
योजनानिहाय झालेला खर्च ,
उद्दिष्टे ,साध्य , कामाच्या
याद्या व सन 2017-18 साठी
प्रस्तावित केलेल्या कामाच्या याद्या इत्यादींचा सविस्तर आढावा घेण्यात आला .
या
बैठकीस मुख्य लेखा व वित्त अधिकारी एस.ए.शेटे , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या
प्रकल्प संचालिका डॉ. रुपाली सातपुते ,
सहायक आयुक्त समाज कल्याण एस.एस. शेळके ,
जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस.के.
मिनगिरे उप आयुक्त जिल्हा पशुसंर्धन डॉ. एस.एस. भोसले , उप मुख्य कार्यकारी
अधिकारी (बा.क.) नवले , शिक्षणाधिकारी
(माध्य)ए.एम. उकिरडे , कार्यकारी
अभियंता दत्तात्रय देवकर , जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. प्रशांत पाटील , जिल्हा उपनिबंधक के.बी. वाबळे,
उप मुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रामपंचायत) अजिंक्य पवार , जिल्हा
प्रशासन अधिकारी राजीव बुबणे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते .
