उस्मानाबाद,दि.1: - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत मार्च 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक
शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षेस नियमित प्रविष्ट होणारे विद्यार्थी व तुरळक
विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी,नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त
झालेले,पुर्वीचे खाजगी विद्यार्थी,श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ट होणारे
विद्यार्थी व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे ऑनलाईन
पध्दतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर करण्याच्या सुधारित तारखा
खालीलप्रमाणे-
माध्यमिक शाळांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरावयाच्या
तारखा नियमित शुल्कासह दिनांक 4 नोव्हेंबर
ते 5 डिसेंबर 2016 पर्यंत राहील. तसेच
दिनांक 29 नोव्हेंबर ते 5
डिसेंबर2016 या कालावधीत शाळांनी परीक्षा शुल्काचे चलन व विद्यार्थ्यांच्या याद्या
एक्सेलशीटमध्ये प्रिंटींग कराव्यात, या परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने
स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे भरण्यासाठी आपल्या शाळेशी
संपर्क साधावा. ऑनलाईन आवेदनपत्रे भरताना येणाऱ्या अडचणींबाबत मुख्याध्यापकांनी
संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.
शासन
निर्णयानुसार ऑनलाईन आवेदनपत्रे भरताना विद्यार्थ्यांचे जन्म ठिकाण नमूद करण्याची
कार्यवाही शाळांनी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये करावी.
इयत्ता 10 वी आवेदनपत्रे भरताना आधार कार्ड क्रमांक नमूद करण्याबाबत अनिवार्य
केलेले असले तरी एखाद्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नोंदणी केलेली असेल तर नोंदणी
क्रमांक देखील ग्राह्य धरण्यात येईल,नोंदणी केलेली नसेल तर निकालापर्यंत आधार
कार्ड काढण्यात येईल असे विद्यार्थ्याने प्राचार्य/मुख्याध्यापकांना लेखी हमीपत्र
देणे आवश्यक आहे. त्यामुळे आधार कार्ड क्रमांक नाही म्हणून आवेदनपत्र भरले नाही असे होणार नाही.
तसेच माध्यामिक शाळांनी बँकेत चलनाव्दारे शुल्क भरावयाच्या तारखा स्वतंत्रपणे
कळविण्यात येतील, मार्च 2017 च्या
परीक्षेसाठी प्रतीवर्षी मंडळामार्फत प्रिंट करून दिली जाणारी प्रिलिस्ट या
वर्षापासून दिली जाणार नाही.सर्व माध्यमिक शाळानी ऑनलाईन प्रिलिस्ट प्रिंट
करून जनरल रजिस्टरप्रमाणे त्याची तपासणी
करावी. तसेच त्यामध्ये काही दुरूस्त्या असल्यास ऑनलाईन पध्दतीने एडिट ऑप्शनद्वारे
दि.19 डिसेंबर 2016 पर्यंत करण्यात याव्यात.असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार
पाटील यांनी कळविले आहे.