Tuesday, 21 July 2026

दिव्यांगजन सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कारासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

दिव्यांगजन सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कारासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन धाराशिव दि.२१ जुलै (जिमाका) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींशी संबंधित समस्यांकडे समाजाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास प्रोत्साहन देण्यासाठी 'दिव्यांगजन सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात येतात. दरवर्षी ३ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिना'निमित्त दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट दिव्यांग व्यक्ती,इतर व्यक्ती तसेच विविध संस्थांचा या राष्ट्रीय पुरस्कारांद्वारे गौरव केला जातो. या पुरस्कारांसाठीची मार्गदर्शक तत्त्वे दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संकेतस्थळावर www.depwd.gov.in तसेच राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in वर उपलब्ध आहेत.या पुरस्कारासाठी अर्ज अथवा नामांकने केवळ 'राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल'वर ऑनलाईन माध्यमातूनच स्वीकारण्यात येत आहेत.ऑनलाईन अर्ज व नामांकन प्रक्रिया १५ मे २०२६ पासून सुरू झाली असून,अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ आहे.इच्छुक व्यक्ती व संस्थांनी विहित मुदतीत पोर्टलवर आपले अर्ज सादर करावेत,असे आवाहन करण्यात आले आहे. दिव्यांग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होणार असल्याने पात्र व्यक्ती आणि संस्थांनी या संधीचा लाभ घेत ऑनलाईन अर्ज सादर करावे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद धाराशिव यांनी केले आहे. *****