उस्मानाबाद.दि.28
:- राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत बहुवर्षीय वैरण पिकाची लागवड व उत्पादन
करुन मुरघास तयार करणे या योजनेचा लाभ
जिल्हयातील ईच्छूक लाभार्थींनी अर्जाच्या स्वरुपातील प्रस्ताव संबंधित तालुक्याचे
पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे दि. 31 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंतच्या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन
उपआयुक्त,उस्मानाबाद यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत
जिल्हयासाठी 5 मे.टन क्षमतेच्या 11 मुरघास युनिटचे आणि 10 मे.टन क्षमतेच्या 10
मुरघास युनिटचे उदिष्ट देण्यात आले आहे.अर्जाचा नमुना आणि प्रस्तावासोबत जोडावयाची
कागदपत्रे अटी व शर्ती याबाबतचा तपशील व या योजनेसाठी
जिल्हयातील निवडलेल्या 494 गावांची यादी
लाभार्थीशी संबंधित तालुक्याचे पशुधन विकास
अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध आहे. तरी ईच्छूकांनी
या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन, जिल्हा पशुसंवर्धन
उपआयुक्त उस्मानाबाद यांनी केले
आहे.