उस्मानाबाद,दि.18:- सेवानिवृत्त वेतनधारक,कुटुंब निवृत्तीवेतनधारक
यांचे हयातनामा बँकेत व संबंधित कोषागार व उपकोषागार कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित
राहून बायो मॅट्रीक डिव्हाईसव्दारे नोंदणी करिता दिनांक 15 जानेवारी 2017 पर्यंत
मुदत वाढविण्यात आलेली आहे. त्यामुळे सेवानिवृत्ती वेतनधारक,कुटूंब
निवृत्तीवेतनधारकांनी संबंधित बँक तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालयात प्रत्यक्ष
उपस्थित राहून दिनांक 15 जानेवारी 2017 पर्यंत हयातनामा सादर करावा, असे कोषागार
अधिकारी विशाल पवार यांनी कळविले आहे.