उस्मानाबाद,दि.16 :- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद आयोजित पुणे, बारामती, कोल्हापूर येथील
खाजगी क्षेत्रातील नामांकित प्रतिथयश उद्योजक/कंपनी यांच्याकडील 650 पदे
भरण्यासाठी पात्र व इच्छूक पुरुष व स्त्री उमेदवारांच्या मुलाखती सोमवार, दि.21
नोंव्हेंबर 2016 रोजी घेऊन निवड करण्यात येणार आहे.
उद्योजक पद, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा पुढील
प्रमाणे राहतील- एम.पी.टी. ए. एज्युकेशन लि, एरंडवणे पुणे अंतर्गत वॉल्वो इंडिया
लि. लोणी पुणे येथे, जॉब ट्रेनी 100 पुरुष, आय.टी. आय. कोणताही ट्रेड 18 ते 26
वयोमर्यादा राहील, मेनन ॲन्ड मेनन लि. कोल्हापूर येथे जॉब ट्रेनी 100 पुरुष आय.टी.आय.
कोणताही ट्रेड 18 ते 26 वयोमर्यादा राहील, यू.एम.डब्लू. डाऊनसिंग लि.तळेगाव जॉब
ट्रेनी 15 पुरुष आय.टी.आय. वेल्डर 18 ते 26 वयोमर्यादा राहील, निप्रो प्रा. लि.
श्रीवाल येथे जॉब ट्रेनी 100 पुरुष 12वी/ आय.टी.आय. कोणताही 18 ते 26 वयोमर्यादा राहील.निओसम प्रा.लि.
सानसवाडी जॉब ट्रेनी 50 पुरुष, 10 वी व 12 वी
किंवा आय. टी. आय.पास, 18 ते 26 वयोमर्यादा, भारत फॉर्ज, मुंडवा रांजणगाव जॉब
ट्रेनी 10 पुरुष, आय.टी.आय.-फिटर, टर्नर, इलेक्ट्रीशिअन, 18 ते 26 वयोमर्यादा,
जबिल सर्कीट प्रा. लि. रांजणगाव जॉब ट्रेनी 50 महिला, 10 वी पास, 18 ते 26
वयोमर्यादा, पियाजो व्हेईकल्स प्रा. लि. बारामती, पियाजो/व्हेस्पा प्रा.लि.,
बारामती जि. पुणे आय. टी. आय. जॉब ट्रेनी
325 पुरुष ,10 वी पास व आय. टी. आय. फिटर,
टर्नर, मशिनिष्ट, शिट मेटल,
मोटर/डिझेल/ट्रॅक्टर मेकॅनिक ट्रेड
पास व 8 वी व आय. टी. आय. वेल्डर/पेंटर
पास , वयोमर्यादा 18 ते 36 अशा
अटी व वयोमर्यादा असतील.
वेतन सुरुवातीस
किमान 8 हजार ते
10 हजार रुपये दरमहा ,
शैक्षणिक योग्यतेनुसार आणि सुविधा,
कॅन्टीन, निवास ट्रान्सपोर्टेशन इत्यादी सुविधांबाबत संबंधित कंपनीच्या
नियमानुसार, प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी कंपनीचे अधिकारी सविस्तर माहिती व
मार्गदर्शन करतील,तसेच आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक/प्रमाणपत्र,
शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.), अनुभव असल्यास प्रमाणपत्र, एम्प्लॉयमेंट
रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आणि 2 पासपोर्ट साईझ
फोटो आदी सर्व
कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपींसह
प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी स्वखर्चाने हजर राहून खाजगी क्षेत्रातील
रोजगाराच्या संधीचा जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक श्री.
रमेश पवार यांनी केले आहे.
संपर्कासाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक (02472- 222236 ) असा आहे. या मेळाव्यात सहभाग नोंदविण्याकरिता
उमेदवारांना या कार्यालयाकडील जॉब सिकर रजिस्ट्रेशन (एम्प्लॉयमेंट नोंदणी) असणे
बंधनकारक आहे.एम्प्लॉयमेंट नोंदणी नसल्यास उमेदवार www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर
नवीन नाव नोंदणी करुन तात्काळ प्रमाणपत्र मिळवू शकतात.