उस्मानाबाद,दि.16:- प्रधानमंत्री पिक विमा
योजना रब्बी हंगाम 2016 साठी पिक विम्याची हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर
2016 ही आहे. तर उन्हाळी हंगामातील उन्हाळी भुईमूग या पिकांचा विमा हप्ता भरण्याची
अंतिम मुदत दिनांक 31 मार्च 2017 ही आहे. पिक विमा योजना ही कर्जदार शेतकऱ्यांना
अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी
ऐच्छिक आहे. पिक विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2016 आहे.
पिक विमा योजनेत जास्तीत जास्त
शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, श्री. शिरीष
जमदाडे यांनी केले आहे.
रब्बी हंगाम 2016 - 17 करीता खाली
दर्शविल्याप्रमाणे उंबरठा उत्पादनाच्या पातळीपर्यंत प्रति हेक्टरी दिलेल्या विमा
संरक्षित रकमेवर दिलेल्या पिक विमा दराप्रमाणे विमा हप्ता भरावयाचा आहे, त्याचा
तपशिल खालीलप्रमाणे:-
गहू (बागायत) विमा संरक्षित रक्कम 3 हजार 300 रुपये, विमा हप्ता दर 1.50
टक्के विमा हप्ता रक्कम रु.(शेतकरी हिस्सा).495/-, गहू (जिरायत) विमा संरक्षित रक्कम 30हजार रुपये विमा हप्ता दर 66
टक्के, विमा हप्ता रक्कम रु.(शेतकरी हिस्सा) 198/-,ज्वारी (बागायत) विमा संरक्षित रक्कम 26हजार , विमा हप्ता दर 1.50
टक्के विमा हप्ता रक्कम रु. (शेतकरी हिस्सा)
390/-,ज्वारी (जिरायत) विमा
संरक्षित रक्कम 24 हजार, विमा हप्ता दर 1.50 टक्के विमा हप्ता रक्कम रु.(शेतकरी
हिस्सा) 360/-,हरभरा विमा संरक्षित रक्कम 24 हजार,विमा हप्ता दर 1.50 टक्के, विमा
हप्ता रक्कम रु. (शेतकरी हिस्सा) 330/-, करडई,
विमा संरक्षित रक्कम 22 हजार, विमा हप्ता दर 1.50 टक्के, विमा हप्ता रक्कम रु.(शेतकरी
हिस्सा) 330/-सूर्यफूल विमा संरक्षित
रक्कम 22हजार, विमा हप्ता दर 1.50 टक्के, विमा हप्ता रक्कम रु.(शेतकरी
हिस्सा) 330/-,रब्बी कांदा विमा संरक्षित
रक्कम 3 हजार 600, विमा हप्ता दर 5.0 टक्के, विमा हप्ता रक्कम रुपये(शेतकरी
हिस्सा) 3 हजार /-उन्हाळी भुईमूग विमा संरक्षित
रक्कम 60हजार , विमा हप्ता दर 1.50 टक्के,
विमा हप्ता रक्कम रुपये(शेतकरी हिस्सा) 540/- असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. शिरीष
जमदाडे यांनी कळविले आहे .