उस्मानाबाद, दि.15:- वेतन
पडताळणी पथकाचा माहे नोव्हेंबर 2016 चा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
आयोजित केला आहे-दौऱ्याचे ठिकाण जिल्हा कोषागार कार्यालय, उस्मानाबाद असून कालावधी
दिनांक 17 ते 19 नोव्हेंबर 2016 असा आहे. दिनांक 17 नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक
कार्यालय,उस्मानाबाद व 18 ते 19 नोव्हेंबर
2016 रोजी जिल्हा/तालुका स्तरावरील इतर कार्यालये असा आहे.
पडताळणीसाठी सेवा पुस्तके
सादर करण्यापूर्वी सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी शासन निर्णय वित्त विभाग क्र.वेपुर 1399/प्र.क्र.5/99/सेवा-10 दिनांक 20
जानेवारी 2001 च्या सोबत जोडलेले विवरणपत्र संबंधितांच्या सेवापुस्तकात लावून
त्याप्रमाणे सेवापुस्तके पडताळणीस सादर करावीत.
सेवा पुस्तके पडताळणीसाठी सादर करताना पुढील एक वर्षात सेवानिवृत्त होणारी
प्रकरणे, मयत, न्यायालयीन/लोकायुक्तांकडील प्रकरणे प्राधान्याने सादर करावीत, सेवा
पुस्तके पडताळणी पथकाकडे सादर करतांना संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाकोषमधील
वेतनिका प्रणालित FFO Login करावे. DDO Login करण्यासाठी BDS साठी वापरण्यात येत
असलेले Username and password वापरावे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके
पडताळणीसाठी सादर करावयाची आहेत त्या कर्मचाऱ्यांचे सेवार्थ Employee ID टाकून
submit करावे, म्हणजे लेखाधिकारी,वेतन पडताळणी पथक यांच्या नावाने कर्मचाऱ्यांच्या
तपशिलासह पत्र तयार होईल. त्या पत्रासह सेवापुस्तके पडताळणीसाठी पथकाकडे सादर करावीत, असे सहसंचालक लेखा व
कोषागारे,औरंगाबाद यांनी पत्राव्दारे कळविले आहे.