Thursday, 11 August 2016

विमुक्त ,भटक्या आणि निम भटक्या जमाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष भिकू इदाते यांचा जिल्हा दौरा

विमुक्त ,भटक्या आणि निम भटक्या जमाती
राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष भिक इदाते यांचा जिल्हा दौरा
उस्मानाबाद,दि.11- विमुक्त, भटक्या आणि निम भटक्या जमाती राष्ट्रीय आयेागाचे अध्यक्ष श्री. भिकू रामजी इदाते हे शुक्रवार  दि.12 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

          दि.12 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे आगमन राखीव.सकाळी उस्मानाबाद येथून ता. तुळजापूरकडे प्रयाण तेथील विमुक्त, भटक्या आणि निम भटक्या जमाती पारंपारिक कलाकारांसमवेत चर्चा. तुळजापूर येथून यमगरवाडीकडे प्रयाणयेथील विमुक्त, भटक्या आणि निम भटक्या जमाती प्रकल्प शाळेला भेट.नंतर सोलापूरकडे प्रयाण.