Tuesday, 9 August 2016

राज्यातील सर्वात पहिली “लोकराज्य वारकरी शिक्षण संस्था ” उस्मानाबाद मध्ये

उस्मानाबाद:- महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या  लोकमान्य: लोकराज्य या मासिकाची ओळख असलेल्या अंकाची परिचिती घेऊन  राज्यातील   या वर्षातील पहिली लोकराज्य वारकरी शिक्षण संस्था  बनण्याचा  बहुमान उस्मानाबाद जिल्ह्यातील श्री.संत कोकणेबुआ वारकरी  शिक्ष्ण संस्थेने मिळविला आहे. या संस्थेतील एकूण 74 विद्यार्थ्यांनी लोकराज्यचे  सभासदत्व स्विकारले आहे.
            ही संस्था  लोकराज्यसंस्था  झाल्यानंतर लोकराज्यच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना जसे पीक विमा योजना , पीक कर्जाच्या पुनर्गठनाचा  निर्णय  , यंदाच्या  खरीप हंगामासाठी राज्याने केलेले नियोजन स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना , प्रधानमंत्री पीक योजना  इत्यादी तसेच विविध शासन निर्णय शासकीय योजना लोकराज्यच्या माध्यमातून अनेक गावांपर्यंत पोहोचतील, कारण या संस्थेत नियमित शिक्षणाबरोबरच वारकरी संप्रदायाचेही शिक्षण येथील विद्यार्थ्यांना दिले जाते. हेच  विद्यार्थी किर्तनाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती अनेक गावांपर्यंत पोहोचवतील,असा विश्वास जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी व्यक्त केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र रंगनाथ इंगळे आणि संस्थेचे सचिव ...योगेश राजेंद्र इंगळे,श्री.आदित्य  गोरे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.