उस्मानाबाद,दि.11:- महाराष्ट्र शासनाचे
मुखपृष्ठ असलेल्या लोकमान्य लोकराज्य
मासिकाची उपयुक्तता लक्षात घेवून
राज्यातील या वर्षातील पहिली
लोकराज्य सामाजिक संस्था बनण्याचा
मान जानकादेवी बहुउद्देशिय सामाजिक
संस्थेने पटकाविला आहे. या संस्थेच्या
सर्वच म्हणजे एकूण 120 सभासदांनी लोकराज्यचे
वार्षिक सभासदत्व स्वीकारले आहे.
याप्रसंगी जानकादेवी बहुउदेशिय
सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अभिजीत
देडे म्हणाले की, या संस्थेमार्फत
जिल्हयात विविध लोककलांचे प्रदर्शन, सादरीकरण, व्यसनमुक्ती
कार्यक्रम, स्वच्छता व आरोग्य विषयक
बाबींवर कार्यक्रमांद्वारे जनप्रबोधन
केले जाते.बळीराजा चेतना
अभियानांतर्गत आमच्या संस्थेने गावोगावी
अनेक कार्यक्रमही केले. मात्र
आता जिल्हा माहिती अधिकारी
मनोज शिवाजी सानप यांनी
लोकराज्य मासिकाचे महत्व समजावून
सांगितले आणि संस्थेने लागलीच 100 टक्के
सभासदत्व स्वीकारण्याचा निर्णय
घेतला.
आमची संस्था
राज्यातील पहिली लोकराज्य सामाजिक
संस्था झाली आहे याचा
आम्हाला निश्चितच खूप आनंद
झाला आहे,खरे तर जिल्हा
माहिती अधिकाऱ्यांनी या मासिकातील
माहितीबाबत आम्हाला सखोल मार्गदर्शन
केले, या मार्गदशनामुळेच आमची
संस्था आम्ही लोकराज्यमय करु
शकलो, यापुढे आम्ही ज्या ज्या
गावांमध्ये कार्यक्रम करू त्या
त्या ठिकाणी लोकराज्य मासिक, माहिती
व जनसंपर्क विभागाचे उपक्रम तसेच शासकीय
योजनांची माहिती आमच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवू
अशी प्रतिक्रिया संस्थेच्या
पदाधिका-यांनी यावेळी व्यक्त
केली.
यावेळी संस्थेचे सचिव व प्रसिध्द अभिनेता अजयकुमार देडे, उपाध्यक्ष श्रीमती दर्शना शिंदे सदस्य श्रीमती पल्लवी क्षीरसागर, प्रयागबाई पारडे,विष्णू गोविंद देडे,इम्तियाज शेख,अवचार उध्दव,कलीम शेख,विपुल कांबळे,इर्शाद काझी हे उपस्थित होते