Tuesday, 7 July 2026
महास्ट्राईड अंतर्गत कंत्राटी मनुष्यबळाची ८ जुलैची मुलाखत रद्द
महास्ट्राईड अंतर्गत कंत्राटी मनुष्यबळाची ८ जुलैची मुलाखत रद्द
धाराशिव दि.७ जुलै (जिमाका)जिल्हा प्रशासनास तांत्रिक सहकार्य आणि धोरणात्मक मार्गदर्शन मिळावे,यासाठी जिल्हा धोरण अंमलबजावणी कक्ष (DSU) स्थापन करण्यात येत असून,या कक्षासाठी उच्च शैक्षणिक पात्रता व अनुभव असलेल्या तज्ज्ञांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार आहे.या भरती प्रक्रियेतील कंत्राटी मनुष्यबळ पदांसाठी मुलाखतीबाबत यापूर्वी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी देण्यात आली होती.
मात्र,काही प्रशासकीय कारणास्तव ८ जुलै २०२६ रोजी होणारी मुलाखत रद्द करण्यात आल्याचे संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी,तसेच,पुढील मुलाखतीची तारीख व वेळ लवकरच जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://dharashiv.maharashtra.gov.in प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने उमेदवारांनी संकेतस्थळावरील अद्ययावत माहितीकडे नियमित लक्ष ठेवावे,असे जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांनी कळविले आहे.
*****