Sunday, 12 April 2026

सामाजिक समता सप्ताहानिमित्त धाराशिवमध्ये स्वच्छता मोहिम ; फकीरा नगर व बौद्ध नगरमध्ये उपक्रम संपन्न

सामाजिक समता सप्ताहानिमित्त धाराशिवमध्ये स्वच्छता मोहिम ; फकीरा नगर व बौद्ध नगरमध्ये उपक्रम संपन्न धाराशिव,दि.१२ एप्रिल (जिमाका) सामाजिक न्याय,आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने दरवर्षी दि.८ ते १४ एप्रिल या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येतो. त्यानुसार सामाजिक समता सप्ताहानिमित्त आज १२ एप्रिल रोजी धाराशिव शहरातील फकीरा नगर व बौद्ध नगर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.या स्वच्छता मोहिमेत सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन कवले,समाज कल्याण अधिकारी सचिन लामकाने तसेच नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. 0000000