उस्मानाबाद,दि.10:- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी
दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या
निर्देशानूसार दिनांक 10 फेब्रुवारी 2018 रोजी
संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10.30 वाजता जेष्ठ नागरिक आनंदराव साहेबराव राजेनिंबाळकर यांच्याहस्ते
दीपप्रज्वलनाने लोकअदालतीचे उद्घाटन झाले.
यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. डी.एन. आरगडे, जिल्हा न्यायाधिश 1 एस.ए.ए.आर औटी, जिल्हा न्यायाधिश 2 पी.जे.
पाटील, जिल्हा न्यायाधिश 3 आर.एन. रोकड, तदर्थ जिल्हा न्यायाधीश श्रीमती आर.जे.
राय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री एस.बी. देसाई, अपर
जिल्हाधिकारी पराग सोमन, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे
उपाध्यक्ष ॲड. रमेश भोसले यांच्यासह न्यायाधीश, जिल्हयातील विधीज्ञ, पक्षकार मोठया
संख्येने उपस्थित होते.

