उस्मानाबाद, 22 :- जिल्हा
विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या वतीने उस्मानाबाद जिल्हयातील जिल्हा विधी
सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्यामार्फत दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 4 या
वेळेत उस्मानाबाद येथील बसस्थानक परिसरात विविध शासकीय कार्यालयामार्फत राबविण्यात
येणाऱ्या आणि जनतेच्या कल्याणकारी विविध शासकीय योजनांच्या माहितीचे स्टॉल्स
लावण्यात येणार आहेत. यामध्ये सध्या कार्यरत असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा
समावेश राहणार आहे.
तरी जास्तीत-जास्त जनतेने या
शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रमुख न्यायाधीश आर.आर. देशमुख, जिल्हा
विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. एस.बी. देसाई तसेच विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲङ
निलेश बारखेडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या
मेळाव्यात पशुसंवर्धन, कृषी विभाग, महिला व बालविकास, महिला आर्थिक विकास महामंडळ,
शिक्षण विभाग जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,
रोजगार हमी योजना, समाजकल्याण, सहाय्यक संचालक जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार
अधिकारी, डी.आय.सी., स्वच्छता मिशन, जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा रेशीम विकास
अधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा पोलीस विभाग हे विभाग सहभागी होणार
आहेत. 