उस्मानाबाद, दि.1:- महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र
असलेल्या “लोकराज्य” मासिकाची उपयुक्ता लक्षात
घेऊन दिशा करियर ॲकॅडमीतील सर्व विद्यार्थ्यांनी “लोकराज्य” मासिकाचे वार्षिक सभासदत्व स्विकारुन राज्यातील पहिले “लोकराज्य स्पर्धा परिक्षा केंद्र”
करण्याचा बहुमान मिळविला आहे.
दिशा करियर ॲकॅडमीच्या कै.
प्रा. अविनाश अवताडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त समता हॉल, उस्मानाबाद
या ठिकाणी आयोजित अवयवदान व रक्तदान शिबिरात ॲकॅडमीच्या 100 टक्के विद्यार्थ्यांनी
अवयवदान व रक्तदान केले याच कार्यक्रमात ॲकॅडमीतील सर्व विद्यार्थ्यांनी “लोकराज्य” मासिकाचे वार्षिक सभासदत्व
स्विकारुन राज्यातील पहिले “लोकराज्य स्पर्धा परिक्षा
केंद्र” करण्याचा बहूमान मिळविल्यामुळे जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते संचालकांचा सन्मान करण्यात आला.
जिल्हा
माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांना माहिती व
जनसंपर्क विभागाचे उपक्रम, “लोकराज्य मासिक” महान्यूज वेबपोर्टलचे महत्व आणि उपयोगिता समजावून सांगितल्यामुळे
दिशा करियर ॲकॅडमीच्या 100 टक्के विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे सभासदत्व स्विकारले
असून लोकराज्य मासिकातील लेखांचे ॲकॅडमीत नियमित वाचन करण्यात येईल असे दिशा करियर
ॲकॅडमीचे प्रा. बाळकृष्ण उंबरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. एकनाथ माले, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा अवयवदान अभियान
समन्वयक डॉ. गजानन परळीकर, नगर परिषदेचे स्वच्छता व्यवस्थापक महारुद्र गालट, दिशा करियर
ॲकॅडमीचे प्रा. बाळकृष्ण उंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
मुकेश क्षिरसागर यांनी केले. सुत्रसंचलन सिध्देश्वर मते यांनी केले तर आभार
सुमित्रा शिंदे यांनी मानले, यावेळी अजित रणदिवे, सुरवसे, वैद्य, शिंदे, चिंगटे
यांच्या सह विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.