उस्मानाबाद, दि.30:- उस्मानाबादी शेळी पालन व संवर्धन
प्रशिक्षणासाठी उस्मानाबाद येथे नागपूर विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्यास
परिवहन, खारभूमी विकास तथा पालकमंत्री श्री.दिवाकर रावते व पशुसंवर्धन, दुग्ध
विकास व मत्सव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालक मंत्री महादेव जानकर यांनी
जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत संमती दिली.
जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक परिवहन, खारभूमी विकास तथा
पालकमंत्री श्री.दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती प्रशासकीय
इमारतीतील जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झाली.
यावेळी पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्सव्यवसाय मंत्री
तथा जिल्ह्याचे सहपालक मंत्री महादेव जानकर,
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, खासदार प्रा.रविंद्र गायकवाड, आमदार
सुजितसिंह ठाकूर, आमदार राहुल मोटे, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर
जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ.एकनाथ माले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अविनाश आघाव, शिक्षणाधिकारी सचिन जगताप,
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विकास जगदाळे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा
श्रीमती. अर्चनाताई पाटील, सर्व उपविभागीय अधिकारी व विविध विभागाचे विभाग प्रमुख व
जिल्हा नियोजन समितीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा
श्रीमती. अर्चनाताई पाटील यांनी यावेळी शेतीला जोडव्यवसाय म्हणून उस्मानाबादी शेळीपालन व संवर्धनासाठी जिल्ह्यात
एखादे प्रशिक्षण केंद्र किंवा विद्यापिठ सुरु करावे अशी मागणी केली. त्यावर पालकमंत्री
श्री. रावते व सहपालक मंत्री श्री. जानकर यांनी नागपूर विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु
करण्याचे मान्य केली.
जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर
आडे यांनी बैठकीचे प्रस्ताविक करुन मागिल बैठकिचा अनुपालन अहवाल सादर केला.
यावेळी पालकमंत्री श्री.रावते
यांनी जिल्हा नियोजन समितीच्या नुतन सदस्यांचे अभिनंद केले.सर्व सदस्य उच्च शिक्षित
असल्यामुळे याचा प्रशासकीय कामासाठी चांगला फायदा होईल,त्याचबरोबर अधिकाऱ्यांनाही
कळेल की, आपणास विचारणारे कोणीतरी आहे, यातून एक चांगला संदेश दिला जाईल.यामुळे भविष्यात
गावाचे, तालुक्याचे व जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठी मदत होईल. असा
आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद जोशी, संदिप मडके,
मकरंदराजे निंबाळर, सक्षणा सलगर, संयोगिता गाढवे, प्रकाश चव्हाण, श्रीमती.बोराडे,
सिध्दार्थ बनसोडे आदींची विविध कामासंदर्भात प्रश्न यावेळी उपस्थित केले.