उस्मानाबाद, दि.31:-
डॉ.आंबेडकर फौंडेशन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकार नवी दिल्ली यांचेकडून
अनुसुचित जाती जमातीच्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे देण्यात
येणारे धनादेश व प्रशस्तीपत्राचे वितरण जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात
आले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात
शिवम सतिश कोळी याला 50 हजार रुपयेचा धनादेश व प्रशस्तीपत्र, प्रगती राजकुमार
बनसोडे हिला 40 हजार रुपयेचा धनादेश व प्रशस्तीपत्र तर उमेश शिवाजी मरपले यास 10
रुपयेचा धनादेश व प्रशस्तीपत्राचे वाटप जिल्हाधिकारी श्री.गमे यांच्या हस्ते
करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रभोदय
मुळे, तिर्थ खुर्दच्या सरपंच सौ. वर्षाराणी पवार, पत्रकार सोमनाथ बनसोडे आदींची
उपस्थिती होती.