उस्मानाबाद,दि.3:-दिवाळीच्या वस्तू व फराळ अल्प दराने
विक्री कणाऱ्या महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून त्यांच्या विक्रीला
प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने राज्य
परिवहन महामंडळाने प्रत्येक बसस्थानकावर रू.1 इतक्या नाममात्र
शुल्क आकारून जागा उपलब्ध करून देणार असल्याचे आवाहन परिवहन व
खारभूमी विकास मंत्री
तथा राज्य परिवहन महामंडळाचे
अध्यक्ष दिवाकर रावते
यांनी केली आहे.
दिवाळी
सणासाठी लागणाऱ्या वस्तू व फराळ विक्रीची अनेक दालने बाजारात सध्या लागलेली आपणास
दिसून येतात त्यामध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तूला व
फराळाला गुणवत्ता व किफायतशीर दरामळे ग्राहक वर्गाकडून विशेष मागणी असल्याचे दिसून येते. परंतु बाजारपेठेतील
प्रस्थापित व्यावसायाकरिता अतिक्रमनामुळे महिला बचत गटांना आपल्या वस्तूची विक्री
करणे सहज शक्य होत नाही. अशा वेळी बसस्थानकाच्या ठिकाणी बचत गटांना जागा उपलब्ध
करून दिल्यास त्यांना सहज ग्राहक उपलब्ध होवून त्यांच्या विक्रिस प्रोत्साहन मिळेल
तसेच ग्राहकाला देखील घरी जाता जाता दिवाळीच्या वस्तू व फराळ घेवून जाणे सहज शक्य
होईल. या हेतूने अनेक महिला बचत गटांनी अध्यक्ष महोदय यांच्यकडे बसस्थानकावर
दिवाळीच्या वस्तू व फराळ विक्री करण्यासाठी दालन उपलब्ध करून देण्यासाची मागणी
केली होती. त्या अनुषंगाने महिला बचत गटांच्या वस्तू विक्रिला (फटाके व ज्वलाग्रही
पदार्थ सोडून) प्रोत्साहन देणे व सर्व
सामान्य प्रवाशी जनतेला अल्प दरात गुणवत्ता पूर्ण वस्तू मिळाव्यात या उददेशाने
राज्य महामंडळाने दिवाळी भाऊबीज भगिनी सन्मान योजना आखली आहे.
यायोजनेंतर्गत प्रत्येक बसस्थानकावर जागेच्या
उपलब्धेतनुसार 100 चौ.फुटाचे 1 दालन याप्रमाणे कमाल 5 दालने प्रत्येक रू.1 एवढे नाममात्र
शुल्क आकारून अर्जदार महिला बचतगटांना दि. 8 ते 22 ऑक्टोंबर या कालावधीसाठी उपलब्ध
करून देण्यात येतील दालन मिळण्यासाठी जिल्हयातील सर्व महिला बचत गटांनी विभागीय कार्यालय राज्य परिवहन,उस्मानाबाद
यांच्याकडे दि.4 ऑक्टोंबर 2017 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन विभाग नियंत्रक राज्य
परिवहन, उस्मानाबाद यांनी केली आहे.