उस्मानाबाद,दि.3: भारत निवडणूक आयोगाच्या No Voter To
Left Behind या घोष वाक्यानुसार उस्मानाबाद तालुक्यातील प्रत्येक मतदारांची मतदार यादीमध्ये
नोंदनी करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्याचे आदेशित केले आहे.
तरी
उस्मानाबाद तालुक्यातील सर्व तरुणांनी आपले नाव मतदार यादीत नोंदनी करावे, मतराद
यादीत नाव नोंद करण्यासाठी एक रंगीत फोटो, वय पुरावा व रहिवाशी पत्रांसह अर्ज
नमुना 6 (सहा) भरून देण आवश्यक आहे. सदर
कार्यक्रम दि.3 ऑक्टोबर 2017 ते 3
नोव्हेंबर 2017 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
तसेच
उस्मानाबाद तालुक्यातील मतदारांना आवाहन करयाण्यात येते की, त्यांनी आपले मतदार
यादीत नाव आहे किंवा नाही हे संबंधित मतदान केद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यकडील
मतदार यादीत खात्री करून तसेच स्थलांतरीत दुबार व मयत लोकांची नावे वगळण्यासाठी
मतदारांनी स्वत: किंवा त्यांच्या कुटंबातील व्यक्तींनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी
यांना नमुना 7 भरून देणे आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त ठिकाणी नावे आढळून आल्यास
लोकप्रतिनिधीत्व कायदा 1950 च्या 17, 18 व 31 नसुार गुन्हा नोंद करण्यात येईल तसेच
मतदार यादीत नाव आहे परंतु फोटो नाही अशा मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO)यांच्याकडे
फोटो जमा करणे अनिवार्य आहे. अन्यथा सदरील नाव वगळण्यात येतील असे आवाहन तहसिलदार
तथा सहाय्यक मतदार नोंदनी अधिकारी उस्मानाबाद यांनी कळविले आहे.