उस्मानाबाद,दि.3:-जिल्हयातील न्यायदंडाधिकारी प्रथम
वर्ग न्यायालयातील कामकाज तत्परतेने व सुरळीत होण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता
1973 चे कलम 25(3)अन्वये विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता या पदासाठी पॅनल तयार
करण्यसाठी विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून विशिष्ट खटल्याकरिता नेमणूकीसाठी
पॅनल तयार करण्यात येणार आहे. या पदाकररिता पात्रतेच्या अटी,शर्ती तसेच अनुषंगीक
माहिती (www.osmanabad.nic.in) या
संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तरी जिल्हयातील इच्छुक विधीज्ञांनी आपले अर्ज जिल्हादंडाधिकारी
यांच्या नावे जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे आपल्या वैयक्तीक माहितीसह
दिनांक 12 ऑक्टोबर 2017 (सुट्टीचे दिवस वगळून) पर्यंत सादर करावेत,असे आवाहन
जिल्हादंडाधिकारी उस्मानाबाद यांनी केले
आहे.