उस्मानाबाद,दि.3:-श्री देवीजींची कोजागिरी
पौर्णिमानिमित्त श्री तुळजाभवानी मंदिरात दिनांक 5 ऑक्टोबर 2017 रोजी साजरी होत
असून पौर्णिमेच्या दिवशी खालीलप्रामाणे धार्मिक विधी करण्यात येणार आहेत-
गुरूवार दि.5 ऑक्टोबर 2017
रोजी रात्री 12-30 पासून श्री देवीजींचा कडी दरवाजा उघडणे. चरणतीर्थ 12-30 ते
1-15.घाट देणे व पुजेस हाक मारणे 1-15 ते 1-20.
पुजारी श्री देवीजीजवळ
येणे व निर्माल्य विसर्जन 1-20 ते 1-30.सरकारी व सोंजी अनंदराव भोपे पूजारी
यांच्या आरत्या 1-30 ते 1-45. श्री देवीजीची सिंहासनावर प्रतिष्ठापना 1-45 ते
2-00. आरत्या 2-00 ते 2-15. धार्मिेक विधी (पालखीवाले) 2-15 ते 2-25. पंचामृत स्नान शुदध स्नान, आरती धूपारती व मेन बसविणे वगैरे
2-25 ते 4-00. देवीजीची नित्य सकाळची पुजा 6-00 आरंभ, श्री देवीजीची सायंकाळची पूजा
7-00 वाजता आरंभ.सोलापूरच्या काठ्यासह छबीन्यांची मिरवणूक व जोगवा
रात्री 11-00 वाजता.