उस्मानाबाद. दि.22:- शैक्षणिक
वर्ष 2016-17 मध्ये इयता 12 वी उत्तीर्ण होऊन 2017-18 मध्ये इंजिनियरींग व मेडीकल
व तत्सम व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या माजी
सैनिक/विधवा/अवलंबीत यांच्या पाल्यांनी केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्याकडे
पंतप्रधान शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज दि. 15 नोव्हेंबर 2017 पर्यंत पाठविण्यात
यावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी सु.मो. गोडबोले यांनी केले.
या योजनेंतर्गत माजी सैनिकांच्या मुलाला रु.24
हजार व मुलीला रु.27 हजार इतकी वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते.
तरी शैक्षणिक वर्ष 2017-18
साठीचे पंतप्रधान शिष्यवृतीचे फॉर्म www:ksd.gov.in या संकेस्थळावरुन ऑनलाईन
प्रक्रियेद्वारे सादर करावेत. या संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करुन ईमेल आयडीवर
पासवर्ड व लिंक प्राप्त झाल्यावर लॉग इन करावे, लॉग ईन करण्यासाठी फोटो, ओळखपत्र,
डिस्चार्ज बुककॉलेजचे बोनाफाइड प्राचार्याचे स्वाक्षरी झालेले, बँकेचे
प्रमाणपत्र-बँक मॅनेजरने स्वाक्षरी केलेले, मूळ मार्कशीट(इ.10 व 12 वी) व बँक पास
बुक, लिंक केले आधारकार्ड, पी.पी.ओ, तसेच सेवानिवृत्तीनंतरचे अपत्याचे प्रमाणपत्र
व शपथपत्र इत्यादी जेपीजी करुन अपलोड करावे, पंतप्रधान शिष्यवृत्तीचा फॉर्म भरुन
सर्व कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड केल्यानंतर सेव्ह आणि फॉरवर्ड केल्यानंतर तो
फॉर्म जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्याकडे तपासणीसाठी येईल.त्यानंतर आपण
भरलेल्या फॉर्मची हार्डकॉपी काढून संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर
करावी.फॉर्म भरण्यास अडचण आल्यास ऑनलाईन फॅार्म भरण्यासाठीचे युजर मॅन्युअल पाहण्यासाठी
सर्व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध आहे. पंतप्रधान शिष्यवृत्तीबाबतची
विस्तारीत माहिती www.ksb.gov.in या संकेतस्थळावर देण्यात
आलेली आहे.
तरी दि.15 नोव्हेंबर 2017
पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारण्यात येणार
नाहीत. माजी सैनिक/विधवा/अवलंबित यांच्या
पात्र विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे
प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.