उस्मानाबाद,दि.15:- राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक
प्रकारच्या आजारातून रुग्णांना लाभ मिळाला आहे.आतापर्यंत 15 हजार रुग्णांना याचा लाभ
झाला आहे, अशी माहिती राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीचे जिल्हा समन्वयक डॉ. गुरूराज थट्टेकर यांनी दिली आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दि 21 नोव्हेंबर 2013 पासून सुरु
करण्यात आली आहे . योजनेला दि. 20 नोव्हेंबर 2016 रोजी 3 वर्षे पूर्ण होत आहेत.या
योजनेत 971 अतिगंभीर व अतिविशिष्ट प्रकारच्या रुग्णांवर या योजनेतून उपचार केले
जातात.राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये नवीन शासन निर्णयानुसार शेतकरी आत्महत्याग्रस्त
14 जिल्ह्यांसाठी पांढरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबाचा समावेश यात करण्यात आला
आहे .उस्मानाबाद जिल्ह्यातून व शहरातून या योजनेंतर्गत विविध प्रकारच्या
रुग्णालयातून लाभ देण्यात येतो. आतापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील 971अतिगंभीर आजारी रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात
आल्या आहेत . जिल्ह्यातील 5 रुग्णालयांतून 3 हजार 261 रुग्णांवर उपचार करुन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
या योजनेतून दि.21
नोव्हेंबर 2013 ते 14 डिसेंबर 2016 पर्यत 15 हजार 184 रुग्णांवर विविध प्रकारची
शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जिल्ह्यातून दि. 10 ऑक्टोबर 2015 ते 30 नोव्हेंबर
2016 या दरम्यान उस्मानाबाद 870, कळंब 553, तुळजापूर 388,
परंडा 357, उमरगा 316, भूम 303,
वाशी 269, लोहारा 139 अशा एकूण 3
हजार 195 रुग्णांवर उपचार करुन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे संबंधित
रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राजीव गांधी
जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे सादर
करावीत - रेशन कार्ड (पिवळे, केशरी, अन्त्योदय, अन्नपूर्णा),पांढरे
रेशनकार्ड व 7/12 उतारा (शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांसाठी), ओळखपत्र –
(आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयीकृत बँक पासबूक व इतर शासनमान्य ओळखपत्र), लहान
मुलांसाठी (6 वर्ष वयापेक्षा कमी) जन्माचा दाखला,आई किंवा वडिलांचे ओळखपत्र, फाटलेले
रेशन कार्ड किंवा रेशन कार्डमध्ये त्रुटी असतील तर संबंधित तहसिलदारांचे
प्रमाणपत्र किंवा दुय्यम शिधापत्रिका असणे
आवश्यक आहे .
या योजनेसाठी
जिल्हयातील जिल्हा रुग्णालय- उस्मानाबाद, सहयाद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
उस्मानाबाद, सुविधा हॉस्पिटल- उस्मानाबाद, निरामय हॉस्पिटल-उस्मानाबाद व चिंचोळी
हॉस्पिटल, उमरगा अंगीकृत रुग्णालयाचा समावेश असून या योजनेच्या अधिक माहितीसाठी
टोल फ्री क्रमांक 155388/18002332200 वर संपर्क साधावा, असे आवाहन राजीव गांधी
जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीचे जिल्हा समन्वयक डॉ. गुरूराज थट्टेकर यांनी केले आहे.
***
वृत्त
क्र.959
कडबाकुट्टी यंत्र / मुरघास युनिट
योजनेसाठी
17 डिसेंबर 2016 रोजी बैठक
उस्मानाबाद,दि.15:- राष्ट्रीय
पशुधन अभियान योजना सन 2016-17
अंतर्गत विद्युतचलित कडबाकुट्टी
यंत्राच्या वापरास प्रोत्साहन आणि मुरघास
तयार करण्याचे युनिट स्थापन करणे या योजनांच्या अंमलबजावणीसाठी
जिल्हा पशुधन अभियान समितीअंतर्गत
गठीत निवड समितीमार्फत लाभार्थींची
निवड करण्यासाठी दि. 17 डिसेंबर 2016 रोजी जिल्हा
पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय , आनंद नगर
उस्मानाबाद येथे दुपारी 12.30
वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे .
या निवड प्रक्रियेसाठी अर्जाच्या
स्वरुपात प्रस्ताव सादर केलेल्या लाभार्थ्यांपैकी योजनेचा लाभ
घेण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थींनी जास्तीत जास्त संख्येने
हजर राहावे, असे आवाहन पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस.एस. भोसले यांनी केले
आहे .
**
वृत्त क्र .960
महाराष्ट्र
वैद्यकीय परिषद निवडणूक 2016
18 डिसेंबर 2016 रोजी होणार मतदान
उस्मानाबाद , दि.
15:- जिल्ह्यात महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक
-2016 ची निवडणूक दिनांक 18 डिसेंबर 2016 रोजी
सकाळी 8.00 ते 5.00 या वेळेत घेण्यात येणार
असून उस्मानाबाद येथे दोन मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत .
मतदान केंद्र क्रमांक -1 निवासी वैद्यकीय
अधिकारी , (बाह्य संपर्क ) जिल्हा सामान्य रुग्णालय , उस्मानाबाद आणि मतदान केंद्र क्रमांक -2
आयुष विभाग , जिल्हा सामान्य रुग्णालय,उस्मानाबाद.
जिल्ह्यातील वैद्यकीय परिषदेकडे नोंद झालेल्या व्यावसायिक
एमबीबीएस डॉक्टर्स मतदारांनी या दिवशी
मतदान करावे ,असे आवाहन उप जिल्हा निवडणूक
अधिकारी , उस्मानाबाद यांनी केले आहे . *****
वृत्त क्र . 961
पिकांवरील कीड व रोगांच्या नियंत्रणाबाबत
उपाययोजनेकरिता फवारणी करण्याचे आवाहन
उस्मानाबाद , दि.
15:- राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत भूम उपविभागात
आंबा फळपिकांवरील कीडरोग सर्वेक्षण , सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प सन 2016-17 राबविण्यात येत असून
या अंतर्गत वाशी , कळंब व परंडा तालुक्यात प्रत्येकी
एका कीड सर्वेक्षकामार्फत तसेच उपविभागातील चारही तालुक्यांत कीड नियंत्रकांमार्फत आंबा पिकावरील प्रमुख किडे तुडतुडे , फूलकिडे तसेच भुरी व
बुरशीजन्य करपा या रोगांसाठी सर्वेक्षण
करण्यात येत आहे . त्या माहितीच्या आधारे
विश्लेषण करुन दर सोमवारी व गुरुवारी पिकांवरील कीड व रोगांच्या नियंत्रणाबाबत उपाययोजना
सूचविण्यात येत आहेत . याबाबतची अधिक
माहिती www.ncipm.org.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
दिनांक 5 डिसेंबर 2016 रोजीच्या प्राप्त सर्वसाधारण
कीडरोग सल्ल्यानुसार , आंबा फळपिकांवर
तुडतुडे या कीडीचा प्रादूर्भाव
दिसून येण्याची शक्यता आहे त्यासाठी
डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के (प्रवाही) 9 मिलिलीटर किंवा मोनोक्रोटोफॉस 36 टक्के
(प्रवाही) 15 मिलिलीटर प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करण्यात यावी, असे आवाहन उपविभागीय
कृषी अधिकारी , भूम यांनी केले आहे .
****
वृत्त क्र . 962
उस्मानाबाद जिल्हा कोषागार कार्यालयाची
विभागीय क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी
उस्मानाबाद.दि.15:- संचालनालय लेखा
व कोषागारे कर्मचारी कल्याण समितीमार्फत
हिंगोली येथे दि. 10 व 11 डिसेंबर 2016 रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर घेण्यात आलेल्या
विभागीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात उस्मानाबाद येथील जिल्हा कोषागार कार्यालयाने विविध स्पर्धा
प्रकारात घवघवीत यश
संपादन केले आहे. क्रिकेट व व्हॉलीबॉल स्पर्धेत
उस्मानाबाद जिल्हा कोषागार कार्यालयाने प्रथम क्रमांक
मिळविला आहे.
वैयक्तिक क्रीडा
प्रकारात देखील कोषागार कार्यालयाने यश संपादन
केले आहे. यात 100 मीटर धावणे या पुरूष गटाच्या स्पर्धेत श्री. एस. आय.
मोहमद व 200 मीटर धावणे या पुरूष गटाच्या स्पर्धेत श्री. एस. के. सरनाईक यांनी
द्वितीय क्रमांक,100 मीटर रिले महिला गटात श्रीमती एस.जी. घोगरे,श्रीमती ए.एन.
नरवाडे,श्रीमती के.बी. गायकवाड, श्रीमती ए.एच.
पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळविला, गोळा फेक पुरूष गटात श्री. व्ही. आर. पवार
यांनी प्रथम क्रमांक मिळविला , थाळी फेक पुरूष गटात व्हि. आर. पवार यांनी प्रथम
क्रमांक मिळविला.,कॅरम एकेरी पुरूष गटात श्री. सी.व्ही. कांबळे यांनी द्वितीय, कॅरम
दुहेरी पुरूष गटात श्री. सी.व्ही. कांबळे, के.डी. मगर यांनी व्दितीय क्रमांक
पटकविला, कॅरेम दुहेरी महिला गटात श्रीमती
एम.व्ही. कुलकर्णी व श्रीमती के. बी. गायकवाउ यांनी द्वितीय क्रमांक , टेबल
टेनिस एकेरी पुरूष गटात श्री. एन.बी.
बारकुल यांनी प्रथम क्रमांक, बॅडमिंटन एकेरी पुरूष गटात एस. मोहमद यांनी द्वितीय
क्रमांक मिळविला.
उस्मानाबाद जिल्हा कोषागार कार्यालयाने मिळविलेल्या या यशाबद्दल जिल्हा कोषागार अधिकारी
श्री. विशाल पवार , अप्पर कोषागार अधिकारी श्री. अप्पासाहेब पवार व
त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे
जिल्ह्यातील अधिकारी – कर्मचारी तसेच
नागरिकांकडूनही अभिनंदन करण्यात आले आहे.****



