शारदीय
नवरात्र महोत्सव-2016
उस्मानाबाद,दि.5:-तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात आज
पाचव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची ललित पंचमीनिमित्त श्रीदेवीजींची
नित्योपचार पूजेनंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली. नवरात्रौत्सवामुळे
तुळजापूरात महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच तेलंगणा, आंध्रप्रदेश व कनार्टक
राज्यातूनही आलेल्या भाविकांनी श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी
केली होती.
भाविकांच्या
सोयी सुविधांसाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.प्रशांत नारनवरे,
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे-घाटे, तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) सुजित नरहरे, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक
दिलीप नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील इतर अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.
ललित पंचमीनिमित्त आज रथ अलंकार पूजा मांडण्यात येते. भगवान
सूर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री भवानी मातेस दिला. याप्रमाणे
रथ अलंकार अवतार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
दररोज श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध
धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.
यात, उद्या दि. 6 ऑक्टोबर रोजी
मुरली अलंकार महापूजा, दि. 7 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा,दि.8 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि
दि. 9 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत. तत्पूर्वी, काल (मंगळवारी)
रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.
नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने पोलिसांचा बंदोबस्त चोख
नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने
पोलीस व्यवस्थेबाबत माहिती घेतली
असता पोलीस अधीक्षक पंकज देशमुख
यांनी सांगितले की , देशातील दहशतवादी
घटनांच्या पार्श्वभूमीवर श्री
तुळजाभवानीच्या मंदिरात कडेकोट
सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे . देवींच्या दर्शनासाठी
25 लाखांपेक्षा जास्त
भाविकांची संख्या ग्राह्य धरुन
गत 15 दिवसापासून पोलीस
बंदोबस्त तैनात करण्यात
आला आहे . भाविकांसह मंदिराची तपासणी
करण्यात येत असून सुरक्षेकरिता
बॉम्बशोधक पथकही याठिकाणी सज्ज आहे . सहाय्यक
पोलीस निरीक्षक एस.आर. जाधव ,पोलीस उप निरीक्षक एस.आर.शिंदे, इतर पोलीस
कर्मचारी, बॉम्बशोधक पथकाचे प्रमुख
अविनाश शिंदे ,सम्राट माने, मंदिर संस्थानचे सुरक्षा अधिकारी सदानंद काळे व
त्यांची टीम हे सर्व एकत्रित समन्वयाने
उत्कृष्ट भूमिका पार पाडीत आहेत.
वृध्द,
अपंग भाविकांना पोलीस कर्मचारी विशेष मदत करीत आहेत. भाविकांना सुलभ दर्शन
मिळावे यासाठी पोलीस
प्रयत्नशील असून भाविकांनी
पोलीस प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहनही श्री. देशमुख यांनी भाविकांना
केले आहे .
यानुषंगाने
साधारणत: 2 हजार पोलीस
अधिकारी-कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे . सर्वत्र पोलिसांचा जागता पहारा आहे . येणाऱ्या व
जाणाऱ्या प्रत्येक भाविकांवर प्रत्यक्ष
पोलीसांकडून , सामान्य वेषातील पोलिसांकडून
तसेच सीसीटीव्हीमधून बारकाईने
लक्ष दिले जात आहे.
याशिवाय या
यात्रेच्या निमित्ताने तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारासमोर उस्मानाबाद
पोलीस दलाच्या वतीने पोलीस दलातील
समाजपरिवर्तनात्मक निवडक
फोटोंचे प्रदर्शन भरविण्यात आले. यामध्ये पोलीस दलातील अधिकारी -कर्मचाऱ्यांकडून सामान्य जनतेला करण्यात
आलेल्या मदतीची छायाचित्रे
छायाचित्र प्रदर्शनाच्या
रुपात मांडलेली आहेत.याचवेळी केंद्र
व राज्य शासनाचे महत्वपूर्ण निर्णय व योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या, स्पर्धा परीक्षेची तयारी
करणाऱ्या सर्व उमेदवारांना
उपयुक्त माहिती देणाऱ्या शासनाच्या
“लोकराज्य” या मासिकाचे महत्व लक्षात
घेवून प्रदर्शनाच्या शेवटी प्रदर्शनास भेट देणाऱ्या भाविकांना “सप्टेंबर 2016” चा “लोकराज्य पोलीस विशेषांक”,
आणि नाजूक फुलांनो कणखर बना … ही महिला कायद्यांविषयीची
माहिती पुस्तिका भेट स्वरुपात देण्यात येत
आहे .
याशिवाय जिल्हा माहिती कार्यालयाच्या स्टॉलवरुन
पोलिसांबाबत समाजात आदर , प्रेम वाढीस लागावे याकरिता
प्रबोधनात्मक बाबी “संवादपर्व” या
उपक्रमातून सांगण्यात येत आहेत.
या विविध लोकाभिमुख
उपक्रमांसाठी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख ,
पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली
घाटगे , सहायक पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन , पोलीस
निरीक्षक हरीष खेडकर , पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे , गोविंद पवार, योगेश
सूर्यवंशी आणि गजानन जाधव यांचे अनमोल
सहकार्य लाभले आहे.

