उस्मानाबाद,दि,3:-
राज्य शासनाच्या “लोकराज्य”
मासिकातील माहितीचा ग्रामीण भागातील जनतेला व विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या
संकल्पनेतून साकारलेल्या “आम्ही झालो लोकराज्य कृषी महाविद्यालय ” या
उपक्रमास प्रतिसाद देत किणी येथील वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे “शासकीय कृषी महाविद्यालय” या
महाविद्यालयाने राज्यातील पहिले “लोकराज्य
शासकीय कृषी महाविद्यालय ” होण्याचा बहुमान पटकाविला आहे. याकरिता
महाविद्यालयाचे प्राचार्य कमलाकर रामराव
कांबळे , डॉ. भागवत दंडनाईक , डॉ. विद्यानंद मनवर यांनी विशेष
पुढाकार घेतला.
या
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी “बळीराजा चेतना अभियान”, स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन तसेच व्यक्तिमत्व
विकास या विषयांवर संवाद साधण्यासाठी
परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप , “शेतकरी आत्महत्यांची कारणे व त्या रोखण्यासाठीचे शाश्वत उपाय”
या विषयावर काम करणारे श्री. विनायक हेगाणा यांची
मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली
होती.
यावेळी
आयुष प्रसाद यांनी केंद्रीय लोकसेवा
आयोगाच्या परीक्षांबद्दल, त्यांच्या नियोजनाबद्दल , अभ्यासाच्या
पध्दतींबद्दल , संदर्भांबद्दल , आज
शासकीय नोकरीत कोणत्या
दृष्टीकोनातून काम करण्याची गरज आहे
याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
“शेतकरी आत्महत्यांची
कारणे व त्या रोखण्यासाठीचे शाश्वत
उपाय”
या विषयावर अभ्यास , संशोधन व प्रत्यक्ष
काम करणारे श्री. विनायक हेगाणा यांनी उस्मानाबाद
आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या
शेतकरी आत्महत्या, त्याची
कारणे आणि त्यावरील
शाश्वत उपाय याबद्दलचे बहुमोल मार्गदर्शन केले .
त्यानंतर जिल्हा माहिती
अधिकारी मनोज सानप यांनी या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व
विकास,शासकीय सेवेत लोकाभिमुख काम आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे विविध
उपक्रम, प्रकाशने, “महान्यूज” वेबपोर्टल, शासकीय संकेतस्थळे याबाबतची
माहिती विद्यार्थ्यांना दिली.
“लोकराज्य”
मासिकाचे त्यांनी महत्व पटवून
देताना श्री. सानप म्हणाले, “लोकराज्य” या मासिकामधील शासकीय
लेखांविषयीच्या माहितीचा विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परिक्षांसाठी निश्चित
उपयोग होणार आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच
विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळणार आहे.त्यामुळे
लोकराज्यचे नियमित वाचन करावे .
राज्यातील
पहिले “लोकराज्य कृषी महाविद्यालय “ बनण्याचा संकल्प केल्यानंतर प्राचार्य कमलाकर कांबळे
व त्यांचे प्राध्यापक सहकारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी
या महाविद्यालयात आता यापुढे दररोज “लोकराज्य”
मासिकातील एक लेख वाचला जाईल असा निश्चय
केला.
या
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहायक प्राध्यापक
डॉ. संतोष सुरेश फुलारी यांनी केले तर आभार सहायक प्राध्यापक डॉ. महेश
वाघमारे यांनी मानले .