उस्मानाबाद.दि.5:-जिल्ह्यात
झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या
नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी
बोलताना अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत देणारच, असे
प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे केले .
जिल्ह्यात 21 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2016 या
कालावधीत अतिवृष्टीने सोयाबीन , तूर , खरीप ज्वारी , बाजरी , मूग ,
उडीद , कापूस , भात , केळी , पपई , भुईमूग
, मका , भाजीपाला इत्यादी पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत
आणि जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे
यांनी काल दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रात्री वाशी तालुक्यातील पारगाव, मलकापूर, हातोला, जेबापिंप्री या
गावांमध्ये तर आज सकाळी उस्मानाबाद तालुक्यातील राजुरी , काक्रंबा , लोहारा तालुक्यातील माकणी ,
उमरगा तालुक्यातील गुंजोटी या गावांमधील पाणीसाठा , अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची व इतर नुकसानीची पाहणी केली. यावेळी माकणी
येथे पालकमंत्री श्री. सावंत यांनी
जलपूजनही केले.
तालुकानिहाय बाधित शेतकऱ्यांची संख्या, पेरणीलायक क्षेत्र ,
पेरणी केलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे आहे -
उस्मानाबाद 34 हजार 392, 1 लाख 2 हजार 100, 91 हजार 770, तुळजापूर -23 हजार
732, 85 हजार 700, 91 हजार 511 , उमरगा
-20 हजार 22 , 76 हजार , 78 हजार 87 ,
लोहारा -21 हजार 791 , 26 हजार 600,
37 हजार 961 , भूम -15 हजार 235 , 37 हजार 200 , 54 हजार 429 , परंडा -6 हजार 696 , 22 हजार 400, 40 हजार 777,
कळंब-25 हजार 319 , 80 हजार 900,74 हजार 263 आणि वाशी
10 हजार 564 , 41 हजार 700, 39 हजार 441 . जिल्ह्यात एकूण जवळपास
5 लाख हेक्टर आर क्षेत्रावर पेरणी झाली होती मात्र अतिवृष्टीने जवळपास 3 लाख हेक्टर आर
क्षेत्र बाधित झाले आहे .
याबाबत पालकमंत्री डॉ.
सावंत यांनी शेतकऱ्यांना त्यांनी कोणत्याही प्रकारची चिंता करु नये, शासन खंबीरपणे
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उभे राहील तसेच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येक
शेतकऱ्याला आवश्यक व योग्य ती मदत दिली जाईल,असे आश्वासन देवून धीर दिला .
यावेळी त्यांच्यासमवेत आमदार
ज्ञानराज चौगुले , जिल्हाधिकारी
डॉ. प्रशांत नारनवरे , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रायते , जिल्हा
कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे, , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले , उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर , श्री निलेश
श्रींगी , उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना नष्टे , लघुसिंचन पाटबंधारे
विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. दशरथ देवकर, तहसिलदार
दिनेश झांपले , उपविभागीय
कृषी अधिकारी श्री. बिराजदार आदी उपस्थित होते .