Friday, 30 September 2016

राज्यातील पहिले “लोकराज्य जीवन विमा कार्यालय” बनण्याचा बहुमान पटकाविला उस्मानाबादच्या जीवन विमा कार्यालयाने

राज्यातील पहिले लोकराज्य  जीवन विमा कार्यालय  बनण्याचा बहुमान  पटकाविला उस्मानाबादच्या जीवन विमा कार्यालयाने
उस्मानाबाद,दि.30:- महाराष्ट्र  शासनाचे मुख्यपृष्ठ  असलेल्या लोकराज्य   मासिकाची उपयुक्तता  लक्षात घेवून  या वर्षातील  पहिले लोकराज्य जीवन  विमा कार्यालय  बनण्याचा बहुमान  उस्मानाबाद  जिल्ह्यातील  जीवन विमा  कार्यालयाने (कोड नं.946)  पटकाविण्यात यश मिळविले आहे .
विमा सप्ताहाच्या समारोप  कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे  म्हणून जिल्हा  माहिती अधिकारी  मनोज शिवाजी सानप  हे उपस्थित  होते. आपल्या भाषणात  त्यांनी माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयाचे  विविध  उपक्रम, प्रकाशने , फेसबुक पेज, ट्विटर हँडल , ब्लॉग  आदींची  माहिती उपस्थितांना सांगितली.  त्यावेळीच  त्यांनी  राज्यातील  पहिले लोकराज्य  जीवन विमा  कार्यालय बनण्याचा बहुमान या कार्यालयास  मिळू शकतो  अशी संकल्पना  मांडली  आणि त्यास  उपस्थित  अधिकारी -कर्मचारी  व इतर  मान्यवरांनीही  संमती दर्शविली . 
त्याच अनुषंगाने उस्मानाबादच्या  या जीवन विमा  कार्यालयाच्या  एकूण 42 अधिकारी  कर्मचाऱ्यांनी लोकराज्य चे  वार्षिक  सभासदत्व  स्वीकारले आणि या वर्षातील  पहिले लोकराज्य जीवन  विमा कार्यालय  बनण्याचा बहुमान  मिळविला. शाखा व्यवस्थापक श्री. बी.एन. केकरजवळेकर , विष्णू मोराळे यांनी या  उपक्रमाकरिता पुढाकार  घेतला.

यानिमित्ताने श्री.  केकरजवळेकर  व त्यांच्या  सहकाऱ्यांनी संकल्प  केला की,  यापुढील  प्रत्येक  कार्यालयीन बैठकीच्या वेळी लोकराज्य  मासिकातील किमान एका लेखाचे  वाचन  आमच्या कार्यालयात केले जाईल. त्याचबरोबर आमच्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकास शासनाच्या योजनांच्या माहितीसाठी लोकराज्य हे अत्यंत उपयुक्त मासिक असून आपणही त्याचे वाचन करावे असे  सांगण्यात येईल .