Friday, 30 September 2016

परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष्‍ प्रसाद यांची सहारा एचआयव्ही बाधीत बालगृह व स्वआधार मतिमंद प्रकल्पास सदिच्छा भेट


उस्मानाबाद दि,30: परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष्‍ प्रसाद यांनी नुकतीच कळंब तालुक्यातील आळणी येथील एचआयव्ही बाधीत व स्वआधार मतिमंद प्रकल्पास सदिच्छा भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व 50 एलईडी बल्ब चे वाटप केले.

    कळंब येथील तुळजाई प्रतिष्ठान संस्थेच्या सहारा HIV बाधीत मुलामुलींच्या बालगृहास तसेच संस्थेच्या आळणी येथील स्वआधार मतिमंद मुलींच्या निवासी प्रकल्पास भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी  अभ्यास करण्याच्या वेगवेगळया पध्दती, आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी दररोज योगा, छंद जोपासने, हात धुण्याच्या पध्दती आदी  गोष्टीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एम.एस.धोनी हा चित्रपट मुलांना दाखवण्यासाठी रूपये 2 हजारची आर्थिक मदतही त्यांनी केली. मुलांसाठी सुसज्य वाचनालय सुरू करून देण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुलांच्या हस्ताक्षराबाबत व मुलांनी गायलेल्या प्रार्थना गीताबद्दल त्यांनी मुलांचे कौतुक केले. एच. आय. व्ही. बाधीत मुलामुलींचे बालगृह कळंब येथे 14 एलईडी बल्ब, संत ज्ञानेश्वर महाराज मूकबधीर शाळा कळंब 16 एलईडी बल्प, स्वआधार मतिमंद निवासी प्रकल्पास 20 एलईडी बल्बचे त्यांनी वाटप केले.