Sunday, 6 October 2019

उस्मानाबाद जिल्हा विधानसभा निवडणूक पूर्वपीठीकाचे प्रकाशन

वि.स. वृत्त :34                                                        दिनांक : 6 ऑक्टोंबर, 2019

उस्मानाबाद जिल्हा विधानसभा निवडणूक पूर्वपीठीकाचे प्रकाशन
        उस्मानाबाद,दि.6: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद यांनी तयार केलेल्या उस्मानाबाद विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकाचे (संदर्भीका) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा-मुधोळ-मुंडे यांच्या आज हस्ते प्रकाशन करण्यात आले.
            सदर पूर्वपीठिकेत सन 1962 ते 2014 या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविलेले उमेदवार, त्यांना मिळालेले मते व विजयी उमेदवार, मिळालेल्या मतदानाची आकडेवारी तसेच महत्वाच्या अधिकारी यांच्या दूरध्वनीची माहितीचा समावेश करण्यात आला आहे.
            यावेळी 240-उमरगा (अ.जा.) आणि 241-तुळजापुर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरिक्षक (सामान्य) जिंतेद्रकुमार उपाध्याय, 242-उस्मानाबाद आणि 243-परंडा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरिक्षक (सामान्य) डॉ. टी बाबू राव नायडू, निवडणूक निरिक्षक (पोलीस) गौतम चिमा, पोलीस अधीक्षक रोशन राजतिलक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पालवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे, 240-उमरगा (अ.जा.) निवडणुक निर्णय अधिकारी विठ्ठल उदमले, 241-तुळजापुर निवडणुक निर्णय अधिकारी चारुशिला देशमुख, 242-उस्मानाबाद निवडणुक निर्णय अधिकारी रामेश्वर रोडगे आणि 243-परंडा निवडणुक निर्णय अधिकारी मनीषा राशिनकर आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
            माध्यम प्रतिनीधीसाठी सदर पूर्वपीठिका प्रसार माध्यम कक्षाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

****
वि.स. वृत्त :35

संवेदनशील मतदान केंद्रावर राहणार चोख बंदोबस्त
-जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
        उस्मानाबाद,दि.6: आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलिस निरीक्षक यांनी एकत्रितपणे संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी देवूत्याठिकाणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उपाययोजन करत चोख बंदोबस्त करुन मतदान प्रक्रिया शांतते पार पडतील यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयतील सभागृहात विधानसभा निवडणूकचे मतदान 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. लोकसभेप्रमाणेच ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्याकरीता जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील संवदेनशील मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडू नये याकरीता संवेनशील मतदार केंद्राच्या आढावा घेण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मुंडे यांनी निवडणूक आणि  निरिक्षक (सामान्य) आणि (पोलीस) यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्रीमती मुंडे या बोलत होत्या. यावेळी 240-उमरगा (अ.जा.) आणि 241-तुळजापुर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरिक्षक (सामान्य) जिंतेद्रकुमार उपाध्याय, 242-उस्मानाबाद आणि 243-परंडा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरिक्षक (सामान्य) डॉ. टी बाबू राव नायडू, निवडणूक निरिक्षक (पोलीस) गौतम चिमा, पोलीस अधीक्षक रोशन राजतिलक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पालवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे, 240-उमरगा (अ.जा.) निवडणुक निर्णय अधिकारी विठ्ठल उदमले, 241-तुळजापुर निवडणुक निर्णय अधिकारी चारुशिला देशमुख, 242-उस्मानाबाद निवडणुक निर्णय अधिकारी रामेश्वर रोडगे आणि 243-परंडा निवडणुक निर्णय अधिकारी मनीषा राशिनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषानुसार, जिल्ह्यात संवेदनशील केंद्रांची माहिती संकलित करुन एकूण 25 मतदान केंद्र संवेदनशील निश्चित करण्यात आली. त्यात उमरगा मतदार संघा मध्ये 3, तुळजापूर 5, उस्मानाबाद 10 आणि परंडा मतदार संघातील 7 केंद्राचा समावेश करण्यात आला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काही मतदान केंद्रांवर कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाला असल्यास अशा मतदान केंद्राची माहिती घेवून. तसेच ज्या मतदान केंद्रावर 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले अशा सर्व केंद्रांची माहिती एकत्रित करून त्याचे विश्लेषण केले आहे. त्याअनुषंगाने आगामी विधानसभा निवडणूक शांततामय व निर्भय वातावरणात पार पाडण्याकरीता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार आहे. सदर संवेदशील मतदान केंद्रावर सी.सी.टी.व्ही., सुक्ष्म निरिक्षक, केंद्रीय राखीव पोलीस दलाची तुकडीद्वारे मतदानाच्या दिवशी चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन करावे. तसेच विधानसभा निवडणुक कालावधीत पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे. तसेच मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वापरण्यात येणारे पैसे व दारुच्या वापराला आळा घालावा यासाठी बेकायदा दारु आणि रोकड वाहतुकीवर लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मुंडे यांनी यावेळी दिले.
            240-उमरगा (अ.जा.) आणि 241-तुळजापुर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरिक्षक (सामान्य) जिंतेद्रकुमार उपाध्याय, 242-उस्मानाबाद आणि 243-परंडा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरिक्षक (सामान्य) डॉ. टी बाबू राव नायडू, निवडणूक निरिक्षक (पोलीस) गौतम चिमा यांनी ही यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना संवेदनशील मतदान केंद्राबाबत करावयाच्या उपाययोजना बाबात मार्गदर्शन केले.