उस्मानाबाद. दि. 11:- उस्मानाबाद जिल्हयातील दिव्यांगासाठी सहाय्यक
उपकरर्ण ज्यात कृत्रीम पाय, हात, खूर्ची इत्यादी मोफत दिले जाणार आहेत. त्यासाठी
दि. 15, 16 व 17 मार्च रोजी जिल्हयात तीन ठिकाणी तपासणी शिबीर आयोजित केले आहे. या
शिबीरासाठी रुरल इलेक्टीफिकेशन कार्पोरेशन लिमीटेड मदत करणार असून दिल्लीच्या तज्ञ
व्यक्तींकडून तपासणी केली जाणार आहे. यासाठी जास्तीत-जास्त लाभार्थींनी लाभ घ्यावा
असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे,
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा व आरोग्य सभापती अर्चनाताई पाटील, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी केले आहे.
यासाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड, 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असलेले
अपंगाचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला, एक पासपोर्ट फोटो या
कागदपत्रासह दि. 15 मार्च रोजी परीचारीका प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालयाचे
मागे, मारवाड गल्ली, उस्मानाबाद, दि. 16 मार्च रोजी ग्रामीण रुग्णाल, सास्तूर ता.
लोहारा, जि. उस्मानाबाद व दि. 17 मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय, कळंब, ता. कळंब,
जि. उस्मानाबाद या ठिकाणी सकाळी 10.00 ते दुपारी 04.00 वाजेपर्यंत उपस्थित राहावे,
असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत वडगावे यांनी केले आहे.